कर्मचाऱ्याच्या घरातून ८ लाख जप्त

By Admin | Updated: July 20, 2016 05:52 IST2016-07-20T05:52:58+5:302016-07-20T05:52:58+5:30

हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणी अटकेत असलेल्या वैद्यकीय समाजसेवा विभागाचे सहायक व्यवस्थापक नीलेश कांबळेच्या घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त

8 lakh seized from employee's house | कर्मचाऱ्याच्या घरातून ८ लाख जप्त

कर्मचाऱ्याच्या घरातून ८ लाख जप्त

मनीषा म्हात्रे, पूजा दामले

मुंबई- हिरानंदानी किडनी रॅकेटप्रकरणी अटकेत असलेल्या वैद्यकीय समाजसेवा विभागाचे सहायक व्यवस्थापक नीलेश कांबळेच्या घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त केली. या प्रकरणात गुजरातहून युसुफ शहा या सातव्या आरोपीला मंगळवारी अटक करण्यात आली आहे.
पनवेल येथील रहिवासी कांबळे गेल्या चार वर्षांपासून पवई हिरानंदानी रुग्णालयात कार्यरत आहे. जास्त पैसे कमविण्याच्या हव्यासापोटी कांबळेने किडनी विक्रीचा धंदा सुरू केला. १४ जुलै रोजी पवई पोलिसांनी हे किडनी रॅके ट उघडकीस आणताच कांबळेंचे बिंग फुटले. पोलिसांनी कांबळे याच्या पनवेल येथील घरातून ८ लाख रुपयांची रोकड जप्त केली आहे. गेल्या चार वर्षांत त्याने किती प्रत्यारोपणे केले याबाबत पवई पोलीस अधिक तपास करत आहेत. या किडनी रॅकेटमधील ही रक्कम असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. ७ बनावट कागदपत्रांमुळे पालिका प्रशासनही जाळ्यात ओढले जाण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. सातही आरोपींना २२ जुलैपर्यंत कोठडी सुनावली आहे.
>विवाह नोंदणी, जन्मदाखला रेशनिंग कार्डही होते बनावट
हिरानंदानी रुग्णालयातील किडनी रॅकेटप्रकरणी पोलिसांनी ७ बनावट कागदपत्रे जप्त केली आहे. या कागदपत्रांमध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र, जन्मदाखला, रेशनिंग कार्ड, आधार कार्ड, निवडणूक ओळखपत्र अशा कागदपत्रांचा समावेश आहे. त्यामुळे ही कागदपत्रे संबंधित यंत्रणेतील कर्मचाऱ्याला हाताशी धरून बनविल्याचे समोर येत आहे. या प्रकरणी पवई पोलीस अधिक तपास करत आहेत.
गुजरात येथील रहिवासी असलेल्या ब्रीजकिशोर जैस्वाल यांची पत्नी असल्याचे भासवून, रेखादेवी प्रसाद म्हणजे शोभा ठाकूर या किडनी दाता म्हणून तयार झाल्या. त्याही मूळच्या गुजरात येथील रहिवासी आहेत. या गुन्ह्यात जैस्वालसहित रेखाही वाँटेड आरोपी असून, दोघांनाही डिस्जार्ज मिळताच अटक करण्यात येणार आहे. या प्रकरणात पोलिसांनी रेशनिंग कार्ड, २४ डिसेंबर १९९४ चे विवाह नोंदणी प्रमाणपत्र, तसेच महानगरपालिकेच्या जी नॉर्थ विभागाने दिलेला रेखादेवी प्रसाद यांचा २९ जानेवारी १९७५ चा जन्म दाखला, पालिकेच्या ई-वॉर्डकडून दिलेला ब्रिजकिशोर लक्ष्मणप्रसाद यांचा जन्म दाखला, अशोक कुमार ब्रिदेश्वरी याचे निवडणूक आयोगाचे ओळखपत्र आणि आधार कार्ड, तसेच रेखादेवी आणि ब्रिजकिशोर जैस्वाल यांच्या फोटोसह नोटरी करण्यात आलेला डोनर फॉर्म अशा कागदपत्रांचा यामध्ये समावेश आहे. त्यामुळे ही कागदपत्रे देणाऱ्या कर्मचाऱ्यांवरही टांगती तलवार आहे.

Web Title: 8 lakh seized from employee's house

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.