मराठवाडा-विदर्भात ८ शेतक-यांच्या आत्महत्या

By Admin | Updated: December 8, 2014 02:22 IST2014-12-08T02:22:29+5:302014-12-08T02:22:29+5:30

दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नापिकीला कंटाळून आणखी सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले.

8 farmers commit suicide in Marathwada-Vidarbha | मराठवाडा-विदर्भात ८ शेतक-यांच्या आत्महत्या

मराठवाडा-विदर्भात ८ शेतक-यांच्या आत्महत्या


औरंगाबाद : दुष्काळाने होरपळून निघालेल्या मराठवाड्यात शेतकरी आत्महत्यांचे सत्र सुरूच आहे. नापिकीला कंटाळून आणखी सात शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले. हिंगोली, नांदेड, लातूर आणि बीड जिल्ह्यात या घटना घडल्या आहेत. तर, विदर्भात एका शेतकऱ्याने आत्महत्या केली.
जळकोट (जि.लातूर) तालुक्यातील राम व्यंकटराव बिरादार (२७) या तरुण शेतकऱ्याने रविवारी दुपारी घरी गळफास घेऊन स्वत:ला संपविले. गेल्या दोन वर्षांपासून तो नापिकीला सामोरे जात आहे. शिवाय त्याच्यावर जिल्हा बँकेचे कर्ज होते. त्याच्या पश्चात पत्नी मुलगा आणि मुलगी आहे.
रोहिणा (ता़ चाकूर, जि. लातूर) येथील गोविंद नारायण केंद्रे (५३) यांनी विषारी औषध प्राशन केले. शनिवारी रात्री त्यांचा मृत्यू झाला़ गेल्या वर्षीच्या ढगफुटीने जमीन खरडून गेली होती़ त्यातच यंदाचा खरीप व रबी हंगाम हातातून गेल्याने ते चिंतेत होते. त्यांच्यावर बँकेचे व खासगी कर्ज देखील आहे़ त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले असा परिवार आहे़
वसमत (जि. हिंगोली) तालुक्यातील कागबन येथील ३२ वर्षीय रघुनाथ रामराव ढवळे यांनी रविवारी सकाळी गळफास घेऊन आत्महत्या केली. सततची नापिकी, आर्थिक व मुलीच्या लग्नाची चिंता यामुळे त्यांनी आत्महत्या केल्याचे मृताचा भाऊ सदाशिव ढवळे यांनी सांगितले आहे. तर, हिंगोली जिल्ह्यातील डिग्रस येथील गोविंद विठ्ठल गोरे (४०) यांनी नापिकी आणि खाजगी कर्जाला कंटाळून रविवारी विष द्राव्य प्राशन करून जीवनयात्रा संपविली. त्यांच्या पश्चात पत्नी आणि मुलगा असा परिवार आहे.
दुबार पेरणी करूनही पीक आले नाही़ त्यामुळे कुटुंबाचा चरितार्थ कसा चालवावा व कर्ज कसे फेडावे या विवंचनेत त्यांनी विष प्राशन करुन ५ डिसेंबर रोजी आत्महत्या केली़ त्यांच्या पश्चात आई-वडील, दोन भाऊ, सहा बहिणी असा परिवार आहे. पीक हातचे गेल्याने ते चिंतेत होते़ ६ डिसेंबर रोजी त्यांनी विष प्राशन केले. (प्रतिनिधी)

 

Web Title: 8 farmers commit suicide in Marathwada-Vidarbha

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.