दुष्काळग्रस्तांना ८ कोटींची मदत

By Admin | Updated: November 8, 2015 01:14 IST2015-11-08T01:14:19+5:302015-11-08T01:14:19+5:30

राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सामाजिक जाणिवेतून परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी दुष्काळग्रस्तांना ८ कोटी रुपयांची मदत करणार आहेत. राज्यात

8 crores aid to drought affected | दुष्काळग्रस्तांना ८ कोटींची मदत

दुष्काळग्रस्तांना ८ कोटींची मदत

मुंबई : राज्यात असलेल्या दुष्काळी परिस्थितीचा विचार करून सामाजिक जाणिवेतून परिवहन महामंडळाचे अधिकारी व कर्मचारी दुष्काळग्रस्तांना ८ कोटी रुपयांची मदत करणार आहेत. राज्यात दिवाळी सण उत्साहात साजरा केला जातो, पण यंदाच्या दुष्काळामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
त्यामुळे दिवाळीत दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत करण्याचा निर्णय शनिवारी परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीत राज्य परिवहन महामंडळाचे अधिकारी आणि कर्मचारी एका दिवसाचे वेतन दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना देणार असल्याचे निश्चित करण्यात आले. राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या वेतनातून जमा झालेला निधी मुख्यमंत्री सहाय्यता निधीस देण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)

Web Title: 8 crores aid to drought affected