शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

दिवाळीमध्ये ७वा वेतन आयोग लागू करणार, मुनगंटीवार यांची माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 19, 2018 06:17 IST

राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली.

- गौरीशंकर घाळेनागपूर : राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना दिवाळीत सातवा वेतन आयोग लागू करण्यात येणार असून, त्या दृष्टीने तयारी सुरू असल्याची माहिती वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी बुधवारी दिली. आयोग लागू केल्यानंतर सरकारी तिजोरीवर २१ हजार ५३० कोटी रुपयांचा बोजा पडेल.केंद्रीय कर्मचाºयांना १ जानेवारी २०१६ पासून वेतन आयोग लागू झाला. त्यानुसार, राज्य कर्मचाºयांना लाभ दिले जातील. त्यासाठी अर्थसंकल्पात १० हजार कोटी रुपयांची तरतूद केली आहे. वेतन आयोग पूर्वलक्षी प्रभावाने लागू करताना थकबाकीची रक्कम त्यांच्या पीएफमध्ये जमा होईल, असे वित्तमंत्र्यांनी सांगितले.वेतन आयोगामुळे राज्यावर पाच लाख कोटी रुपयांचे कर्ज झाल्याचा विरोधी पक्षाचा दावा चुकीचा आहे. मार्च २०१९ अखेर राज्यावरील बोजा ४ लाख ६१ हजार कोटी रुपयांवर जाईल, असा अंदाज आहे. राज्याच्या सकल उत्पन्नावर कर्जाचा बोजा मोजला जातो. आपल्याला सकल उत्पन्नाच्या २५ टक्के कर्ज काढण्याची मुभा असली, तरी आजमितीला राज्यावरील कर्जाचे प्रमाण हे १६.५ टक्के इतके आहे.जीएसटीमुळे राज्याचे उत्पन्न वाढले. एप्रिल ते जून २०१७ या काळात २५ हजार ७४२ कोटी रुपये मिळाले. जीएसटीनंतर २०१८ मध्ये या काळात ३५ हजार ९१५ कोटी रुपये मिळाले. ही ३९.५२ टक्के वाढ आहे, अशी माहिती त्यांनी दिली.महसुली खर्च कमीमहसूल वाढत असताना महसुली खर्च ५० टक्क्यांवरून ४५ टक्क्यांवर आणण्यात सरकारला यश आल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :MONEYपैसा