राज्यात सहा नव्या नगरपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान
By Admin | Updated: April 17, 2016 21:50 IST2016-04-17T21:32:43+5:302016-04-17T21:50:04+5:30
राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले.

राज्यात सहा नव्या नगरपंचायतींसाठी ७८ टक्के मतदान
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १७ - राज्यात नव्याने झालेल्या सहा नगरपंचायती आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी आज रविवारी मतदान झाले. उद्या या निवडणुकींचा निकाल जाहीर होणार असून, त्यातून राज्यातील राजकारणाचा कल कुठल्या दिशेला आहे ते स्पष्ट होणार आहे.
सिंधुदूर्ग जिल्ह्यातील कुडाळ, सातारा जिल्ह्यातील लोणंद, सोलापूर जिल्ह्यातील माढा, माळशिरस, मोहोळ उस्मानाबाद जिल्ह्यातील लोहारा या सहा नगरपंचायतींसाठी ७८.१५ टक्के आणि राज्यातील एक हजार १५१ ग्रामपंचायतींसाठी अंदाजित ७५.३५ टक्के मतदान झाले.
कुडाळमध्ये काँग्रेस नेते नारायण राणे विरुद्ध शिवसेनेचे आमदार वैभव नाईक असा सामना आहे. त्यामुळे या निकालाकडे सर्वांचेच लक्ष असेल. राज्यातील महानगरपालिका आणि जिल्हापरिषदांच्या रिक्त झालेल्या जागांसाठीही आज पोटनिवडणूक झाली.
नवी मुंबई महापालिका पोटनिवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या संध्या यादव वॉर्ड क्रमांक सहा यादव नगरमधून विजयी झाल्या. त्यांनी अपक्ष उमेदवार मधुमती पाल यांचा ७८६ मतांनी पराभव केला.