सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार

By Admin | Updated: October 7, 2014 23:27 IST2014-10-07T23:20:51+5:302014-10-07T23:27:08+5:30

कुष्ठरोग निर्मुलन पंधरवडा : औषधोपचारासह जनजागृतीचीही गरज.

77,000 leprosy patients treated in six years | सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार

सहा वर्षात ७७ हजार कुष्ठरुग्णांवर उपचार

नीलेश शहाकार/बुलडाणा
कुष्ठरोगाविषयी समाजात मोठय़ा प्रमाणात जनजागृती झाली, तरच समाजात दडून राहीलेले कुष्ठरुग्ण स्वत:हून औषधोपचारासाठी समोर येतील. या आजाराच्या निर्मुलनासाठी सुरुकरण्यात आलेल्या राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमांतर्गत गत सहा वर्षांत आरोग्य विभागाकडून ७७९४६ रुग्णाचे कुष्ठरोग निर्मुलन करण्यात आले.
केंद्र शासनाकडून २0१७ पर्यंत बारा पंचवार्षिक योजनांमध्ये कुष्ठरोग दुरीकरण मोहीम आखण्यात आली आहे. या मोहिमेतून प्रत्येक वर्षाच्या ऑक्टोबर महिन्यापासून राज्यात विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात येते. याअंतर्गत ज्या तालुक्यांमध्ये नवीन कुष्ठरुग्णांचे प्रमाण एक लाख लोकसंख्येमागे १0 पेक्षा जास्त आहे, अशा तालुक्यांमध्ये विशेष कुष्ठरुग्ण शोध मोहीम राबविण्यात आली. या उपक्रमाद्वारे जनतेमध्ये जनजागृतीही करण्यात आली.
या मोहिमेतून वैद्यकिय अधिकारी, आरोग्य सहाय्यक, आरोग्य कर्मचारी, आशा वर्कर, सामाजिक न्याय विभाग, शिक्षण विभाग, अन्न व नागरी पुरवठा विभाग, नगर विकास विभाग, राज्य वाहतूक विभाग, माहिती व प्रसिद्धी माध्यमे, प्रसार भारती, रेल्वे, एसटी महामंडळ, प्राथमिक आरोग्य केंद्र आणि नागरी आरोग्य केंद्र यांचा सहभाग घेण्यात आला. विशेष पथकांची स्थापन करुन त्यांना प्रशिक्षण देण्यात आले. यांच्यामार्फत संशयित कुष्ठरुग्ण शोधून त्यांचे कुष्ठरोगाबाबत निदान करण्यात आले. गत सहा वर्षात राज्यभरात ९२ हजार ६00 कुष्ठरोग रुग्णांचे निदान करुन, त्यांच्यावर औषधोपचार करण्यात आले.
कुष्ठरोग आरोग्य शिक्षण जनजागरण मोहीम ऑक्टोबर महिन्याच्या पंधरवड्यापर्यत सर्वत्र राबविण्यात येत आहे. या जनजागृती मोहीमेतून विविध माध्यमाद्वारे कु ष्ठरोगाविषयीची माहिती जनतेपर्यंत पोहोचवली जाणार आहे. तसेच नविन रुग्ण शोधून त्यांच्यावर उपचारही केले जाणार असल्याचे बुलडाणा येथील नागरी कुष्ठरोग केंद्राचे डॉ.ई.बी.शिंदे यांनी सांगीतले.

*अमरावती विभागात आढळलेले रुग्ण
जिल्हा                 रुग्ण
अकोला                २७३
वाशिम                 १७५
अमरावती             ४८३
बुलडाणा               २७५
यवतमाळ             २७५

उपचारानंतर बरे झालेले कुष्ठरुग्ण
वर्ष           रुग्ण                     बरे झालेले रुग्ण
२00८-0९    १४२७४                  ११५१६
२00९-१0    १५0७१                  १४१५८
२0१0-११    १५४९८                  १४४३४
२0११-१२    १७८९२                  १५४९८
२0१२-१३    १८७१५                  १७३९८
२0१३-१४    १११५0                    ४९४२(जूनपर्यंत)

Web Title: 77,000 leprosy patients treated in six years

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.