शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस : कृषी विभाग 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 9, 2018 20:48 IST

पुणे : राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. औरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यात २५ ते ५० टक्के ,१४३ तालुक्यात ...

ठळक मुद्देमराठवाड्याची स्थिती चिंताजनक, २०० हून अधिक तालुक्यांत पाणी परिस्थिती गंभीरऔरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस पिकनिहाय दुष्काळी भागातील शेतक-यांना आर्थिक मदत६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस

पुणे: राज्यावर दुष्काळाची छाया गडद झाल्याचे कृषि विभागाच्या अहवालावरून स्पष्ट झाले आहे. सरासरीच्या केवळ ७८ टक्के पाऊस पडला असून २०० हून अधिक तालुक्यांत पाणीटंचाईची स्थिती गंभीर आहे. औरंगाबाद,लातूर,उस्मानाबाद,बीड यांसह राज्यातील १३ जिल्ह्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला. राज्यातील ३५५ तालुक्यांपैकी २८ तालुक्यात २५ ते ५० टक्के ,१४३ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला आहे.१२१ तालुक्यात ७५ ते १०० पाऊस पडला आहे. केवळ ६३ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात म्हटले आहे. राज्यातील सरासरी पाऊस १ हजार १४२ मिलिमीटर असून ५ आॅक्टोबरपर्यंत ८७७ मि.मी. म्हणजेच सरासरीच्या ७६.८ टक्के पाऊस झाला आहे. पावसाने पाठ फिरविल्याने मराठवाड्याची स्थिती चिंताजनक आहे. औरंगाबाद विभागात एकूण २८ तालूक्यांपैकी ५ तालुक्यात २५ ते ५० टक्के तर २१ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पावसाची नोंद झाली असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्के पाऊस झाला आहे.विभागात पावसातील खंडामुळे पिकांच्या वाढीवर परिणाम झाला असून उत्पादनात घट होण्याची शक्यता आहे.त्याचप्रमाणे कापूस पिकावर रस शोषणा-या किडीचा व शेंदरी बोंडअळीचा अल्प प्रमाणात प्रादूर्भाव आढळून आला आहे.लातूर विभागात ४८ तालुक्यांपैकी ३ तालुक्यात २५ ते ५० टक्के २६ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ ६ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा जास्त पाऊस झाला असल्याचे कृषी विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले आहे.नागपूर विभागातील तापमानात किंचित वाढ झाली असून विभागातील ६४ तालुक्यांपैकी २२ तालुक्यात ५० ते ७५ टक्के पाऊस झाला असून केवळ १२ तालुक्यात १०० टक्क्यांपेक्षा अधिक पाऊस झाला आहे. विभागात कापूस पिकावर रस शोषणारी किडीचा व शेंदरी बोंडअळीचा,भात पिकावर काही ठिकाणी पिवळा खोडकिडा आणि करपा रोगाचा प्रादूर्भाव आढळून आला आहे..................वेळेवर पाऊस न झाल्यामुळे अनेक पिकांचे नुकसान झाले आहे.त्यामुळे शेतकरी अडचणीत सापडला आहे. १९६३ मध्ये राज्य शासनाने दुष्काळ शब्द काढून टाकला आहे.त्यामुळे दुष्काळी स्थितीनंतर प्रत्येक वेळी केंद्र शासनावर अवलंबून राहावे लागते.त् रिझर्व बँकेच्या अनेक योजनांचा लाभही मिळत नाही.त्यामुळे राज्य शासनाने आपल्या कार्यकक्षेत दुष्काळ शब्दाचा अंतर्भाव करण्यासाठी परिपत्रक काढावे. पिकनिहाय दुष्काळी भागातील शेतक-यांना आर्थिक मदत द्यावी.जनावरांना चारा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी.दुष्काळी भागातील विद्यार्थ्यांचे शुल्क माफ करून आजारी नागरिकांना आरोग्याची सुविधा उपलब्ध करून द्यावी.-बुधाजीराव मुळीक,ज्येष्ठ कृषीतज्ज्ञ

टॅग्स :PuneपुणेRainपाऊसagricultureशेतीState Governmentराज्य सरकार