शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

आरोग्य विभागात ७५ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिकची ‘ॲलर्जी’

By सोमनाथ खताळ | Updated: February 6, 2025 11:29 IST

-सोमनाथ खताळ   बीड : अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी सर्व संस्थांसह कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली; परंतु आरोग्य विभागातील ...

-सोमनाथ खताळ  बीड : अधिकारी, कर्मचाऱ्यांची हजेरी घेण्यासाठी सर्व संस्थांसह कार्यालयांमध्ये बायोमेट्रिक प्रणाली कार्यान्वित केली; परंतु आरोग्य विभागातील ९७ हजार डॉक्टर, कर्मचाऱ्यांपैकी केवळ २२ हजार लोकच अंगठा लावून हजेरी नोंदवितात. त्याचा टक्का केवळ २२ इतका आहे. ७५ हजार जणांना ‘ॲलर्जी’ असल्याचे समाेर आले आहे. असे असतानाही या सर्वांचे वेतन नियमित अदा केले जात आहे. त्यामुळेच राज्याचे आरोग्य संचालक डॉ. नितीन अंबाडेकर यांनी सर्व जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना पत्र काढून अपडेट करण्याच्या सूचना दिल्या आहेत. यासाठी ७ फेब्रुवारीपर्यंत मुदत दिली आहे. 

कर्तव्य एका ठिकाणी, हजेरी दुसरीकडेच

अनेक डॉक्टर, कर्मचारी हे कर्तव्याचे ठिकाण एक असले तरी हजेरी मात्र दुसऱ्याच संस्थेत नोंदवत असल्याचे समोर आलेले आहे. बीडमध्ये तर काही लोकांनी बायोमेट्रिक मशीनच घरी नेली होती. तर काहींनी खोटे शिक्के तयार करून घेत शिपायांमार्फत हजेरी लावलेली आहे. 

बायोमेट्रिक प्रणालीत आता अपडेट काय होणार?

कामचुकारांना लगाम घालण्यासाठी आता ही प्रणाली अपडेट केली जात आहे. ज्या संस्थेत अधिकारी, कर्मचारी कार्यरत आहेत, तेथेच जाऊन हजेरी नोंदवायची आहे. त्याचे लोकेशन आणि आधारही संलग्न केले जाणार आहे. दुसऱ्या ठिकाणी हजेरी नोंदविल्यास ते समजणार आहे तसेच फेस रीडिंगही होणार आहे. यासाठी एईबीएएस हे ॲप डाऊनलोडची सुविधा केली आहे.

टॅग्स :Maharashtra Governmentमहाराष्ट्र सरकारHealthआरोग्यGovernmentसरकारEmployeeकर्मचारी