शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
3
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
4
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
5
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
6
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
7
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
8
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
9
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
10
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
11
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
12
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
13
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
14
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
15
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
16
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
17
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
18
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
19
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
20
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ७५ ओमायक्रॉनबाधित; मुंबईतील रुग्णसंख्या ४०० पार

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 5, 2022 08:07 IST

राज्यात आतापर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  राज्यात मंगळवारी ७५ ओमायक्रॉन बाधित रुग्ण सापडले आहेत. हे सर्व रुग्ण राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेने रिपोर्ट केले आहेत. राज्यात आतापर्यंत एकूण ६५३ ओमायक्रॉन विषाणू बाधित रुग्णांचे निदान झाले आहे. यापैकी २५९ रुग्णांना  त्यांची आरटीपीसीआर चाचणी निगेटिव्ह आल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. मुंबईत ओमायक्रॉन रुग्णांनी ४००चा आकडा पार केला आहे.

दिवसभरातील रुग्णांमध्ये मुंबई ४०, ठाणे मनपा ९, पुणे मनपा ८, पनवेल ५, नागपूर आणि कोल्हापूर प्रत्येकी ३, पिंपरी चिंचवड २, भिवंडी निजामपूर मनपा, उल्हासनगर, सातारा, अमरावती आणि नवी मुंबई  प्रत्येकी १ इत्यादी रुग्णांचा समावेश आहे.

९१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबितराज्यात १ नोव्हेंबरपासून आलेल्या आंतरराष्ट्रीय प्रवाशांचेदेखील क्षेत्रीय पातळीवर सर्वेक्षण सुरु आहे. विमानतळ आणि क्षेत्रीय सर्वेक्षणातून आतापर्यंत २,३९७ प्रयोगशाळा नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. यापैकी ९१ नमुन्यांचा अहवाल अद्याप प्रलंबित आहे.आरटीपीसीआर केलेले प्रवासीअतिजोखमीचे देश    ३३,४०२ इतर देश    २१,९३० एकूण     ५५,३३२ 

जिल्हा/मनपा आढळलेले     एकूण रुग्णमुंबई     ४०८* पुणे मनपा       ७१ पिंपरी चिंचवड     ३८ पुणे ग्रामीण     २६ ठाणे मनपा     २२ पनवेल     १६ नागपूर     १३ नवी मुंबई     १० सातारा    ८कल्याण-डोंबिवली     ७उस्मानाबाद  आणि कोल्हापूर     ५वसई-विरार     ४नांदेड आणि भिवंडी निजामपूर मनपा     ३औरंगाबाद, बुलडाणा, मीरा भाईंदर आणि सांगली      २लातूर, अहमदनगर, अकोला,  रायगड, उल्हासनगर अमरावती    १एकूण     ६५३ nयातील २६ रुग्ण हे इतर राज्यातील, तर प्रत्येकी १ रुग्ण पालघर, जळगाव, नवी मुंबई, नाशिक, रायगड आणि औरंगाबाद येथील आहे. ७ रुग्ण ठाणे  आणि ४ रुग्ण कोल्हापूर जिल्ह्यातील आहेत. ९ रुग्ण विदेशी नागरिक आहेत. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरील सर्वेक्षणात हे रुग्ण आढळले आहेत.

तपासण्यांची आकडेवारी१ डिसेंबरपासून राज्यातील मुंबई, पुणे आणि नागपूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर मंगळवारी सकाळपर्यंत करण्यात आलेल्या तपासणीचा तपशील : एकूण आलेले प्रवासीअतिजोखमीचे देश    ३३,४०२इतर देश    १,९६,०२७ एकूण     २२,४२९ 

टॅग्स :Omicron Variantओमायक्रॉन