शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफीच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या, यंदा १९७ शेतक-यांनी कवटाळले मृत्यूला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2017 18:58 IST

अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्यात, हे उल्लेखनीय. यंदाच्या खरिपात पेरणीपासूनच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे दुबार-तिबार पेरणीचे ...

अमरावती, दि. २५ - सततचा दुष्काळ, कर्जबाजारीपणा, मुला-मुलींचे शिक्षण, विवाह आदींसाठी शेतक-यांचा सुरू असलेला संघर्ष अपुरा ठरत असून नैराश्य हावी होत असल्याचे चित्र आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्युला कवटाळले आहे. शासनाने कर्जमाफी जाहीर केल्यानंतरच्या ८० दिवसांत ७४ शेतकरी आत्महत्या झाल्यात, हे उल्लेखनीय. यंदाच्या खरिपात पेरणीपासूनच पाऊस बेपत्ता आहे. त्यामुळे दुबार-तिबार पेरणीचे संकट शेतक-यांवर ओढवले. खरिपाच्या मूग, उडीद, सोयाबीन आदी पिकांच्या सरासरी उत्पादनात घट झाली आहे. शासनाने २८ जुनला  शेतक-यांचे दीड लाखांपर्यंतचे कर्ज माफ केले. मात्र, खरिपातील पिके पावसाअभावी माना टाकत असल्याने जगावे कसे, या विवंचनेत असलेल्या शेतक-यांनी आत्महत्येचा पर्याय स्वीकारला. थकबाकीदार असल्याने बँकांनी कर्ज नाकारले. त्यातच तातडीच्या १० हजारांच्या कर्जवाटपाची घोषणा शासनाने केली. तथापि  प्रत्यक्षात एकाही शेतक-याला कर्ज मिळाले नाही. त्यामुळे शेतकरी अडचणीत आला. सलग नापिकीमुळे शेतक-यांवरील कर्ज वाढत आहे. त्यामुळे शेतकरी आत्महत्या वाढल्या आहेत. राज्यात सर्वाधिक शेतकरी आत्महत्या अमरावती विभागात झाल्याची नोंद आहे. त्यातही यवतमाळ, अमरावती व वाशिम जिल्ह्यात शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. यंदा जिल्ह्यात १९७ शेतक-यांनी मृत्यूचा फास आवळला. यामध्ये ७७ प्रकरणे पात्र, ४५ अपात्र तर ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. शेतकरी आत्महत्यांची नोंद एक जानेवारी २००१ पासून ठेवण्यात येत असून तेव्हापासून आतापर्यंत तीन हजार २४९ शेतक-यांच्या आत्महत्यांची नोंद करण्यात आली. यापैकी एक हजार ३११ प्रकरणे पात्र, एक हजार ८६३ अपात्र तर अद्याप ७५ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत. आता पोलीस अधिकारी देणार अहवाल शेतकरी आत्महत्या घडल्यानंतर पोलिसांकडे पंचनामा व शवविच्छेदन यापलिकडे फारसा तपास नसायचा. सर्व पडताळणी महसूल विभाग करायचा. त्यानंतर तालुक्यातून जिल्हास्तरावर अहवाल जात असे. जिल्हा समितीची बैठक दोन-तीन महिन्यानंतर व्हायची. एकंदर शेतकरी आत्महत्येनंतर त्या कुटूंबाला मदत मिळायला किमान चार महिने तरी लागायचे. मात्र, शासनाने निर्णय घेऊन  शेतकरी आत्महत्यांचा तपास पोलिसांकडे सोपविला असून  आठवड्याच्या आत अहवाल मागविण्यात येत असल्याने आता वारसांना लगेच मदत मिळणार आहे.

कर्जमाफीच्या काळात वाढल्या आत्महत्याशासनाने जूनच्या शेवटी शेतक-यांची दीड लाखांपर्यंतची कर्जमाफी जाहीर केली. मात्र, याच कालावधीत यंदा शेतकरी आत्महत्यांमध्ये वाढ झाली आहे. जून महिन्यात २२, जुलै २५, आॅगस्ट २७ तर २२ सप्टेंबरपर्यंत २० शेतक-यांनी आत्महत्या केल्या आहेत. यंदा जानेवारीत १९, फेब्रुवारी २४, मार्च ३०, एप्रिल १४ व मे महिन्यात १७ शेतकºयांनी मृत्यूला कवटाळले. यामधील ७६ प्रकरणे चौकशीसाठी प्रलंबित आहेत.

टॅग्स :FarmerशेतकरीSuicideआत्महत्याGovernmentसरकार