७२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

By Admin | Updated: February 21, 2016 01:20 IST2016-02-21T01:20:23+5:302016-02-21T01:20:23+5:30

तालुक्यातील वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ७२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील २६ विद्यार्थ्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती

72 students get screwed poisoning | ७२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

७२ विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

हिंगणा : तालुक्यातील वानाडोंगरी येथील राजीवनगरात असलेल्या शांतिनिकेतन विद्यालयातील ७२ विद्यार्थ्यांना विषबाधा झाली. यातील २६ विद्यार्थ्यांना नागपूर येथील मेडिकल हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आले आहे. सर्व विद्यार्थी पहिली ते सातवीमधील आहेत.
वानाडोंगरी येथील राजीवनगर भागात शांतिनिकेतन विद्यालय आहे. या विद्यालयातील विद्यार्थ्यांना शनिवारी दुपारी २.१३ वाजताच्या सुमारास नेहमीप्रमाणे शालेय पोषण आहारात खिचडी देण्यात आली. त्यानंतर सायंकाळी ४ च्या सुमारास काही विद्यार्थ्यांना उलट्या व्हायला सुरुवात झाली. काहींच्या पोटातही दुखायला सुरुवात झाली. त्यामुळे विद्यार्थ्यांनी ही बाब मुख्याध्यापक व शिक्षकांना सांगितली. पाहता पाहता विद्यार्थ्यांची संख्या ७२ वर पोहोचली. शिक्षकांनी या सर्व विद्यार्थ्यांना लगेच हिंगणा येथील ग्रामीण रुग्णालयात आणले. (प्रतिनिधी)

Web Title: 72 students get screwed poisoning