१५ मिनिटांत ७०३ कोटींचे प्रकल्प मंजूर
By Admin | Updated: February 12, 2015 05:14 IST2015-02-12T05:14:29+5:302015-02-12T05:14:29+5:30
रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, डोंगराळ भागातील झोपडपट्ट्यांच्या पाणीदराचे धोरण असे सुमारे ७०३ कोटींचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या

१५ मिनिटांत ७०३ कोटींचे प्रकल्प मंजूर
मुंबई : रस्त्यांचे काँक्रिटीकरण, डांबरीकरण, डोंगराळ भागातील झोपडपट्ट्यांच्या पाणीदराचे धोरण असे सुमारे ७०३ कोटींचे प्रस्ताव कोणतीही चर्चा न करता मुंबई महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सत्ताधारी शिवसेना-भाजपा युतीने अवघ्या १५ मिनिटांत मंजूर केले़
आर्थिक वर्ष संपण्यास अवघा महिना असल्याने ७० टक्के निधी संपविण्यासाठी दर्जाची पर्वा न करता घाईगडबडीत कंत्राटांची खैरात वाटण्यात आल्याचे बोलले जात आहे़ २०१५-२०१६ चा अर्थसंकल्प ४ फेब्रुवारीला जाहीर झाला़ तरीही २०१४-२०१५ मधील पायाभूत प्रकल्पांसाठी राखीव निधीपैकी जेमतेम ३० टक्केच आतापर्यंत खर्च झाला आहे़ लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांचे लक्ष्य घेऊन उतरलेल्या युतीने विकासकामांचे वर्षभरात बारा वाजवले़ आता आयत्यावेळी प्रस्ताव मंजूर करावे लागत असल्याचा सूर विरोधकांनी लावला आहे़ बुधवारी मंजूर प्रकल्पांमध्ये झालेल्या पश्चिम उपगनरांतील रस्त्यांचे काँक्रिटीकरणाचे सहाशे कोटी, तर डांबरीकरणासाठी शंभर कोटींचा प्रस्ताव आहे़ तसेच झोपडपट्ट्या, आदिवासी पाड्यातील पाणीपुरवठ्याबाबतचे धोरणही आहे़ यासह औषध खरेदी सुधारित खर्च म्हणून तीन कोटी ५४ लाख अधिक ८१ लाख ७२ हजार मंजूर करण्यात आले. पर्जन्य जलवाहिन्या उच्च क्षमतेचे पंप पुरवठ्यासाठी एक कोटी ८३ लाख रुपये मंजूर करण्यात आले. (प्रतिनिधी)