शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात 'जम्बो'भरती! ४ ऑक्टोबरला एकाचवेळी तब्बल १०,३०९ उमेदवार शासकीय सेवेत होणार दाखल
2
महाराष्ट्रातील हॉटेल, दुकाने आता २४ तास सुरू राहणार; पण 'या' आस्थापनांवर मात्र निर्बंध कायम
3
“मराठा समाजाला आरक्षणाची अत्यंत गरज, पण सरकारने...”; खासदार शाहू महाराजांनी व्यक्त केली खंत
4
ठाणे महापालिकेच्या अतिक्रमण विभागप्रमुखाला २५ लाखांची लाच घेताना अटक; अगोदर घेतलेले १० लाख
5
मंत्रालयातील लूटीला चाप बसणार! सल्लागारांच्या नियुक्त्यांमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी निर्णय
6
GST घटला, पण सरकारचा खजिना भरला, सप्टेंबर महिन्यात झाली विक्रमी कमाई   
7
ICC Womens World Cup : 'लेडी मॅक्सवेल'ची विक्रमी सेंच्युरी; असा पराक्रम करणारी ठरली पहिली बॅटर
8
मुंबई मनपा निवडणुकीपूर्वी उद्धवसेनेला मोठा धक्का; ‘या’ गटाचे प्रमुख, पदाधिकारी शिवसेनेत
9
VIDEO: परंपरा.. प्रतिष्ठा.. अनुशासन.. 'या' ठिकाणी पुरूष साडी नेसून करतात गरबा, कारण...
10
“वाट कसली पाहता? शेतकरी भाजपात आल्यावर कर्जमुक्ती करणार का?”; उद्धव ठाकरेंचा थेट सवाल
11
संविधान सत्याग्रह पदयात्रेदरम्यान पोलिसांकडून पाळत, काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षांचे सरकारला आव्हान, म्हणाले...
12
NHIDCL: एनएचआयडीसीएलमध्ये नोकरी, 'या' पदांसाठी भरती; १ लाख ५० हजारांपर्यंत पगार!
13
वय वर्ष ३१, संपत्ती ₹२१,१९० कोटी! कोण आहे भारतातील सर्वात तरुण अब्जाधीश? काय काम करतो?
14
लोकसंख्येतील बदल घुसखोरीपेक्षाही घातक...! असं का म्हणाले पंतप्रधान मोदी? देशाला दिला गंभीर इशारा
15
'ओला दुष्काळ जाहीर करा', उद्धव ठाकरेंनी दाखवले CM फडणवीसांचे पत्र, म्हणाले, "मलाही वेदना झाल्या.."
16
CM फडणवीसांचा ‘तो’ Video विरोधकांनी दाखवला; म्हणाले, “गांभीर्याने विचार करा, असले राजकारण...”
17
शौक बड़ी चीज है! १७ व्या वर्षी iPhone 4, iPad 2 साठी विकली किडनी, आता आयुष्यभराचं दुखणं
18
पुतीन यांची दहशत...! 27 देशांनी घेतला रशियाचा धसका; जगात पहिल्यांदाच तयार होणार 'ड्रोन वॉल', कसं काम करणार?
19
बोगस खेळाडू आढळल्यामुळे वय निश्चितीची अट; शालेय क्रीडा स्पर्धांपासून मुले राहताहेत वंचित
20
'देशद्रोह्यांनी मॅच एन्जॉय केली असेल', IND-PAK सामन्यावरुन उद्धव ठाकरेंची बोचरी टीका

मुंबई विद्यापीठाचे७० हजार विद्यार्थी अजूनही निकालाच्या प्रतीक्षेत! आठ निकाल बाकी : निकाल गोंधळ सुरूच  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 05:10 IST

मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत.

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या निकालाचा गोंधळ संपता संपायचे नाव घेत नाही. विद्यापीठाचे आता फक्त आठ निकाल बाकी असले तरी तब्बल ७० हजार विद्यार्थी निकालापासून वंचित आहेत. सप्टेंबर महिना उजाडूनही या विद्यार्थ्यांना निकाल न मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चिंतेत वाढ होत आहे. ७० हजार विद्यार्थ्यांपैकी तब्बल ५७ हजार ९९ विद्यार्थ्यांचे निकाल अद्याप जाहीर झालेले नाहीत. तर २८ हजार विद्यार्थ्यांचे निकाल जाहीर होऊनही राखीव ठेवल्याने त्यांना मिळालेले नाहीत. दुसरीकडे लवकरात लवकर निकाल जाहीर करू, असे मुंबई विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे यांनी सोमवारी जाहीर केले आहे.महिनाभरापासून विद्यापीठाचा कारभार प्रभारी खांद्यावर आहे. या टीमला मंगळवारी कारभार हाती घेऊन एक महिना झाल्याने कामाचा आढावा घेण्यासाठी पत्रकार परिषद घेण्यात आली. या वेळी प्रभारी कुलगुरू डॉ. देवानंद शिंदे, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे, प्र-कुलगुरू धीरेन पटेल, विशेष अधिकारी विनायक दळवी, उपकुलसचिव दीपक वसावे उपस्थित होते.बीएच्या परीक्षांच्या पेपर तपासणीचे काय?मुंबई विद्यापीठाचे सर्व निकाल अद्याप जाहीर झाले नसतानाही विद्यापीठाने द्वितीय सत्रातील परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे.पण, या परीक्षांचे मूल्यांकन आॅनलाइन पद्धतीने होणार की नाही, याविषयी अजूनही निर्णय घेण्यात आलेला नाही.बीए पाचव्या सत्राच्या परीक्षा या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २२ नोव्हेंबर, बीएससी पाचव्या सत्राच्या ८ नोव्हेंबर, सहाव्या सत्राच्या २७ नोव्हेंबर, तर बीकॉम पाचव्या सत्राच्या २० नोव्हेंबर आणि सहाव्या सत्राच्या परीक्षा या १५ डिसेंबरपासून घेण्यात येणार आहेत. पण, आता आॅनलाइन मूल्यांकनासाठी विद्यार्थी संघटना तयार नाहीत. विद्यार्थी संघटनांनी या पद्धतीला कडाडून विरोध केला आहे.लवकरच निकाल जाहीर करणारक्यूआर कोडवरून उत्तरपत्रिका ठेवताना गठ्ठा बदलला गेला किंवा स्कॅनिंग करताना दुसºया ठिकाणी झाला यामुळे उत्तरपत्रिका इतरत्र गेल्या आहेत. पण त्यांचा शोध घेऊन लवकरच निकाल जाहीर करण्यात येणार असल्याचे विद्यापीठ प्रशासनाचे म्हणणे आहे.विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत प्रभारी कुलगुरूडॉ. देवानंद शिंदे यांनी सांगितले, पदभार स्वीकारला तेव्हा १८० अभ्यासक्रमांचे निकाल जाहीर झालेले नव्हते. त्यानंतर गेल्या एका महिन्यात म्हणजे कामाच्या २० दिवसांत तब्बल १७२ निकाल जाहीर केले आहेत. विद्यापीठ पालकाच्या भूमिकेत आहे. विद्यार्थ्यांवर आलेले दडपण लक्षात घेऊन निकाल आता लवकरात लवकर जाहीरकरण्यात येतील.३५ हजार उत्तरपत्रिकांची तपासणी बाकीआता विद्यापीठाचे एकूण ८ निकाल शिल्लक आहेत. यापैकी ४ निकाल हे नियमित वाणिज्यच्या विद्यार्थ्यांचे तर, ४ निकाल हे वाणिज्यच्या आयडॉलच्या विद्यार्थ्यांचे आहेत. मुंबई विद्यापीठाच्या १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ६४ हजार ६०४ उत्तरपत्रिकांची तपासणी अन्य विद्यापीठांनी केली आहे. १७ लाख ९४ हजार ६३७ उत्तरपत्रिकांपैकी ३५ हजार १८८ उत्तरपत्रिकांची तपासणी बाकी आहे.पुनर्मूल्यांकनाचे निकालही लवकरचजाहीर झालेल्या निकालापैकी आतापर्यंत २२ हजार २७५ अर्ज पुनर्मूल्यांकनासाठी आले आहेत. या विद्यार्थ्यांचे निकालही वेळेत जाहीर केले जातील. बाहेर जाणाºया विद्यार्थ्यांची अडचण लक्षात घेऊन २ हजार ६३० परदेशात जाणाºया विद्यार्थ्यांना निकाल दिल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे प्रभारी संचालक डॉ. अर्जुन घाटुळे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :Mumbai Universityमुंबई विद्यापीठStudentविद्यार्थीMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार