आत्महत्येप्रकरणी ७०० पानी आरोपपत्र
By Admin | Updated: June 1, 2015 05:06 IST2015-06-01T05:06:59+5:302015-06-01T05:06:59+5:30
ओशिवरा येथे बहिण-भाऊ, आई व तिचा सहकारी यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी टिंकू सिंगविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.

आत्महत्येप्रकरणी ७०० पानी आरोपपत्र
मुंबई : ओशिवरा येथे बहिण-भाऊ, आई व तिचा सहकारी यांनी एकाचवेळी आत्महत्या केल्याप्रकरणी पोलिसांनी अखेर आरोपी टिंकू सिंगविरोधात ७०० पानी आरोपपत्र दाखल केले आहे.
भारती पाल (२५), सोमनाथ पाल (२०), त्यांची आई शिखा व त्यांचा सहकारी यांनी २० फेब्रुवारी २०१५ रोजी आत्महत्या केली होती. भारती व सोमनाथ हे आरोपी टिंकू सिंगकडे कामाला होते.त्यानंतर पोलिसांनी सिंगला अटक केली. त्यावेळीनपुंसक असल्याचा दावा सिंगने केला.
सिंगने भारतीला विवाहासाठी विचारणा केली होती. त्यास तिने नकार दिला होता. हा नकार तो पचवू शकला नाही. तिला तो डांबूनही ठेवायचा व तिची सुटका करण्यासाठी आलेल्या सोमनाथलाही तो मारहाण करायचा, असा दावा पोलिसांनी आरोपपत्रात केला आहे. आत्महत्येस प्रवृत्त करणे, विनयभंग असे गंभीर आरोप ठेवण्यात आले आहेत. नपुसंक असल्याचा खोटा दावा सिंग करत आहे. तो नपुंसक नसल्याचे पुरावे आमच्याकडे आहेत. तसेच तपासात सिंगच्या लॅपटॉमध्ये काही अश्लील व्हीडीओही पोलिसांना सापडले आहेत. हे व्हीडीओ बघ, असे सिंग भारतीला धमकवायचा, असा पोलिसांचा आरोप आहे. (प्रतिनिधी)