दोन वर्षांत ७0 बम्बार्डियर
By Admin | Updated: February 27, 2015 02:08 IST2015-02-27T02:08:18+5:302015-02-27T02:08:18+5:30
अनेक वर्षे जुन्या लोकलने प्रवास करणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. ७२ पैकी दोन बम्बार्डियर लोकल मार्चपर्यंत प्रवाशांच्या

दोन वर्षांत ७0 बम्बार्डियर
मुंबई : अनेक वर्षे जुन्या लोकलने प्रवास करणाऱ्या उपनगरीय लोकल प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. ७२ पैकी दोन बम्बार्डियर लोकल मार्चपर्यंत प्रवाशांच्या सेवेत दाखल होणार असल्याची माहिती रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुद आणि एमआरव्हीसीचे व्यवस्थापकीय संचालक प्रभात सहाय यांनी पत्रकार परिषदेत दिली. त्याचप्रमाणे उर्वरित ७0 लोकल मार्च २0१७ पर्यंत टप्प्याटप्प्याने दाखल होणार असल्याचे सांगण्यात आले.
मध्य आणि पश्चिम रेल्वे मार्गावर भेल, रेट्रोफिटेड लोकल धावतानाच सिमेन्स कंपनीच्या लोकलही धावत आहेत. आता बम्बार्डियर कंपनीच्या नव्या लोकल प्रवाशांच्या दिमतीला आणण्याचा निर्णय एमआरव्हीसीने घेतला आहे. अशा ७२ लोकल उपनगरीय प्रवाशांच्या सेवेत आणल्या जाणार असून त्यांची बांधणी चेन्नईतील आयसीएफमध्ये (इंटीग्रल कोच फॅक्टरी) केली जात आहे. यातील दोन लोकल दीड वर्षापूर्वी मुंबईत दाखल झाल्या आणि त्यांची पश्चिम रेल्वे मार्गावर चाचणीही घेण्यात आली. या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वेकडून सहा वेळा मुहूर्त काढण्यात आला. परंतु अनेक तांत्रिक अडचणींचा सामना करावा लागल्याने हा मुहूर्त टळत गेला. अखेर चर्चगेट ते बोरीवली मार्गावर रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी या लोकलची चाचणी घेतल्यानंतर त्या सुरू करण्यास कुठलीच अडचण नसल्याचे सांगितले. तशी शिफारस रेल्वे बोर्डाकडे करण्यात आली. मात्र या लोकल सुरू करण्यासाठी रेल्वे बोर्डाकडून अखेरची मंजुरी आलेली नाही.