तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी ७ जणांना अटक

By Admin | Updated: April 22, 2016 03:57 IST2016-04-22T03:57:38+5:302016-04-22T03:57:38+5:30

भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबाबाई देवी मंदिर गाभारा प्रवेशावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सात जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली

7 people arrested in Tripti Desai assault case | तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी ७ जणांना अटक

तृप्ती देसाई मारहाण प्रकरणी ७ जणांना अटक

कोल्हापूर : भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांना अंबाबाई देवी मंदिर गाभारा प्रवेशावेळी झालेल्या मारहाणप्रकरणी गुरुवारी श्रीपूजकांसह सात जणांना जुना राजवाडा पोलिसांनी अटक केली. सायंकाळी न्यायलयाने त्यांची जामिनावर मुक्तता केली.
अ‍ॅड. केदार वसंत मुनिश्वर (वय ३८ रा. कोल्हापूर), श्रीश रामचंद्र मुनीश्वर (५६ रा. मंगळवार पेठ), आशिष (२६ रा. महाद्वार रोड), मयूर मुकुंद मुनिश्वर (४१, कोल्हापूर), निखील दीपक शानबाग (२५ कोमटे गल्ली, शिवाजी पेठ), किसन मुरलीधर कल्याणकर (५६ रा. १९२४ बी वॉर्ड ,मंगळवार पेठ, न्यू इंग्लिश मेडियम शाळेशेजारी), जयकुमार रंगराव शिंदे (५९ रा. ६९० /२८ ताराराणी कॉलनी, संभाजीनगर मंगळवार पेठ) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. गेले पाच दिवस हे आरोपीे पोलिसांना हुलकावणी देत होते

Web Title: 7 people arrested in Tripti Desai assault case