आमदाराचे ३ लाखांचे ७ बोकड चोरीस

By Admin | Updated: March 26, 2016 01:33 IST2016-03-26T01:33:36+5:302016-03-26T01:33:36+5:30

धुळे शहरातील भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्या मालकीच्या ‘गोट फार्म’मधून सात बोकड व एक ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या बोकडांची किंमत अंदाजे

7 lakh goat stolen from the MLA | आमदाराचे ३ लाखांचे ७ बोकड चोरीस

आमदाराचे ३ लाखांचे ७ बोकड चोरीस

धुळे : धुळे शहरातील भाजपाचे आमदार अनिल गोटे यांच्या मालकीच्या ‘गोट फार्म’मधून सात बोकड व एक ट्रॅक्टरची बॅटरी अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. या बोकडांची किंमत अंदाजे तीन लाख ३० हजार रुपये आहे.
धोंडी शिवारात (ता. धुळे) आ. गोटे यांचे शेत आहे़ या ‘गोट फार्म’च्या कम्पाउंडमधून ३ लाख रुपयांचे सात बोकड व ३० हजार रुपयांची ट्रॅक्टरची बॅटरी चोरट्यांनी लांबविली़ शुक्रवारी बोकड चोरीस गेल्याचे उघडकीस आले़ सादीक खान इजाजखान पठाण (रा़ मुस्लीम नगर, धुळे) यांच्या फिर्यादीवरून पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: 7 lakh goat stolen from the MLA