नगर जिल्ह्यात चार अपघातांत ७ ठार
By Admin | Updated: October 27, 2016 00:56 IST2016-10-27T00:56:27+5:302016-10-27T00:56:27+5:30
अकोले, श्रीगोंदा व नगर तालुक्यात बुधवारी तीन अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला. श्रीगोंद्यात अपघातानंतर दोघे बुडाले तर नगर, अकोले, राहुरी तालुक्यात रस्ते

नगर जिल्ह्यात चार अपघातांत ७ ठार
अहमदनगर : अकोले, श्रीगोंदा व नगर तालुक्यात बुधवारी तीन अपघातांत सहा जणांचा मृत्यू झाला. श्रीगोंद्यात अपघातानंतर दोघे बुडाले तर नगर, अकोले, राहुरी तालुक्यात रस्ते अपघातात पाच जणांचा बळी गेला.
श्रीगोंदा तालुक्यातील नगर-दौंड रोडवरील निमगाव खलू शिवारातील भीमा नदी पुलावर झालेल्या मालट्रक-मोटारसायकलच्या अपघातात दोघांना जलसमाधी मिळाली. अशोक बापू सांगळे (३२) व संदीप सोनवणे यांचे मृतदेह ग्रामस्थांनी रात्री उशीरा बाहेर काढले. अकोले तालुक्यातील टँकर-मोटरसायकल अपघातात लखन उमाजी मेंगाळ (१९) व सुखदेव धावजी (२०) जागीच ठार झाले.
अहमदनगर केडगाव-अकोळनेर रोडवरील ट्रक व कारच्या टकरीत शामलाल आसनानी (५५) व मुकेश आसनानी (२०) या बापलेकाचा मृत्यू झाला. तर राहुरी तालुक्यातील गोटुंबा आखाडा येथे टाटा मॅजीक वाहनाचे टायर फुटल्याने झालेल्या अपघातात हैदराबाद येथील स्वाती श्रीनिवास गुप्ता (२९) जागीच ठार झाल्या. सात जण जखमी झाले आहे. (प्रतिनिधी)