शहरं
Join us  
Trending Stories
1
जगदीप धनखड यांच्या राजीनाम्याचं टायमिंग अनेकांना न पटण्यासारखे; 'त्या' ३ तासांत काय घडले?
2
एकदा- दोनदा नाही, एअर इंडियाला सहा महिन्यात ९ कारणे दाखवा नोटीस बजावल्या; सरकारची माहिती
3
४ मुलांच्या आईनं २४ वर्षाच्या युवकाशी केलं कोर्ट मॅरेज; पतीनं सोडला सुटकेचा नि:श्वास, म्हणाला...
4
जगदीप धनखड यांचा उपराष्ट्रपतीपदाचा राजीनामा; प्रकृतीच्या कारणास्तव निर्णय
5
आजचे राशीभविष्य, २२ जुलै २०२५: 'या' २ राशींसाठी लाभदायी दिवस, अचानक धनलाभ होईल
6
'आम्ही अणुकार्यक्रम सुरूच ठेवणार', युरोपीय देशांशी चर्चेपूर्वी इराणचा अमेरिकेला संदेश
7
पहिला दिवस गोंधळाचा; विरोधक झाले आक्रमक; पहलगाम हल्ला ते बिहार मतदारयादीवरून गोंधळ 
8
शाळेवर विमान कोसळून २० ठार; बांगलादेशात अहमदाबादची पुनरावृत्ती!
9
एअर इंडिया विमानाचे तीन टायर फुटले; विमानतळावर लँडिंगच्या वेळी पावसामुळे विमानाने धावपट्टी सोडली
10
मुख्यमंत्र्यांनी कोकाटेंना सुनावले; जे काही घडले ते भूषणावह नाही!
11
ब्रिगिट मॅक्रॉन ‘पुरुष’? खटले आणि वादांना ऊत! दाव्याची सत्यता काय?
12
अंधेरी मेट्रो स्थानकात गळती; पाणी गोळा करण्यासाठी बादल्यांचा वापर
13
भाजपचा नवा फॉर्म्युला; प्रत्येक आमदाराची पाच कामे होणार! पालिका निवडणुकीसाठी रणनीती
14
परिचारिकांच्या संपामुळे पाच दिवसांपासून रुग्णांचे हाल; नियमित शस्त्रक्रियाही पूर्णपणे बंद
15
विधवा महिलेस १.२० लाखात गुजरातेत विकले, दोन वर्षांनी पुत्रप्राप्तीनंतर आणून गावात सोडले!
16
सोळावे वरीस... धोक्याचे नव्हे, निवडणुकीत मत देण्याचे! ब्रिटनचा धाडसी निर्णय; युवाशक्ती लोकशाहीत सहभागी!
17
शेअर ट्रेडिंगच्या बहाण्याने वृद्धेसह पायलटला १० कोटींचा गंडा; बनावट ॲपचा वापर करून लावला चुना
18
६३ खासदार म्हणतात, न्या. वर्मांना पदावरून हटवा! कारण काय?
19
संपादकीय : नामुष्कीचा बॉम्ब, १९ वर्षांनंतरही पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह
20
महाराष्ट्रातील ४ लाख शेतकरी लाभार्थी यादीतून झाले गायब; लाभार्थी १०.२ लाखांवरून केवळ १५ हजारांवर

ट्रक-कार अपघातात ७ भाविकांचा मृत्यू

By admin | Updated: May 25, 2017 01:58 IST

बोलेरे जीप व मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला.

लोकमत न्यूज नेटवर्कअहमदनगर : बोलेरे जीप व मालट्रकची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील यवत (ता. दौंड) येथील सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला. ही घटना नगर-औरंगाबाद महामार्गावरील धनगरवाडी शिवारात बुधवारी पहाटे २ वाजण्याच्या सुमारास घडली. सर्व भाविक बुलढाणा येथील सैलानी बाबांच्या दर्शनासाठी चालले होते. अपघातात मयत झालेल्यांमध्ये बाळू किरण चव्हाण (५०), स्वप्नील बाळू चव्हाण (१७), मनोहर रामभाऊ गायकवाड (४५), गोकुळ रामभाऊ गायकवाड (४०), अंकुश दिनकर नेमाने (४५), अरुण पांडुरंग शिंदे (५०), मुबारक अबनास तांबोळी (५२) यांचा समावेश आहे.यवत येथील भाविक बोलेरो जीपमधून बुलढाणा येथील सैलानी बाबांच्या दर्शनाला जात होते़ ही बोलेरो बुधवारी पहाटे २ वाजता धनगरवाडी शिवारात येताच जीप चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. यामुळे जीप औरंगाबादकडून अहमदनगरकडे येणाऱ्या मालट्रकला समोरासमोर धडकली. ही धडक एव्हढी भीषण होती की, यात सात भाविकांचा जागीच मृत्यू झाला़ अपघाताची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विनोद चव्हाण यांचे पथक त्वरित घटनास्थळी दाखल झाले़ स्थानिक ग्रामस्थांच्या व क्रेनच्या मदतीने पोलिसांनी ट्रकमध्ये अडकलेली बोलेरो जीप काढली. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून मध्यरात्री जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. उत्तरीय तपासणीनंतर पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात दिले़ दरम्यान अपघाताच्या घटनेनंतरफरार झालेला आदिनाथ कैलास इलग (२१, रा. नेवासा) यास पोलिसांनी ताब्यात घेतले असून ट्रकचालकाविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.