शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला दिला स्पष्ट संदेश
2
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
3
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
4
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
5
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
6
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
7
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
8
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
9
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
10
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
11
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
12
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
13
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
14
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
15
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
16
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
17
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
18
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
19
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
20
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका

राज्य बँकेकडून राज्यातील ४२ साखर कारखान्यांना ६८९ कोटी कर्ज मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2019 12:20 IST

सोलापूरच्या चार साखर कारखान्यांचा समावेश; जिल्हा बँकही देणार कर्ज

ठळक मुद्देसाखरेला उठाव नसल्याने केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास साखर कारखान्याला परवानगीराज्यातील ४२ साखर कारखान्यांना महाराष्टÑ राज्य सहकारी (शिखर) बँकेने ६८९ कोटी २ लाख ७९ हजार रुपये कर्ज मंजूर केले

सोलापूर: साखरेला उठाव नसल्याने केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास साखर कारखान्याला परवानगी दिल्याने राज्यातील ४२ साखर कारखान्यांना महाराष्टÑ राज्य सहकारी (शिखर) बँकेने ६८९ कोटी २ लाख ७९ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे. यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार साखर कारखान्यांचा समावेश आहे.

यंदा साखरेचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर झाले शिवाय मागील वर्षीच्या गाळपाची कारखान्यांकडे साखर शिल्लक आहे. साखरेला उठाव नसल्याने कारखान्यांना शेतकºयांच्या उसाचे पैसे देणे कठीण झाले आहे. साखर विक्री होत नसल्याने कारखान्यांकडून सॉफ्टलोन घेण्यास परवानगी मागितली होती. केंद्र शासनाने सॉफ्टलोन घेण्यास परवानगी दिली आहे. कारखान्यांनी आपापल्या सोईने विविध बँकांकडे कर्जाची मागणी केली असून, राज्य बँकेने राज्यातील ४२ कारखान्यांना ६८९ कोटी २ लाख ७९ हजार रुपये कर्ज मंजूर केले आहे़ या कर्जावरील एक वर्षाचे व्याज हे केंद्र शासन भरणार आहे. 

यामध्ये सोलापूर जिल्ह्यातील चार कारखान्यांचा समावेश आहे. सहकार महर्षी शंकरराव मोहिते-पाटील साखर कारखान्याला ४१ कोटी ९३ लाख, लोकमंगल शुगर इथेनॉल भंडारकवठेला १६ कोटी ५८ लाख, सहकार शिरोमणी वसंतराव काळे साखर कारखान्याला १३ कोटी ५३ लाख, संत दामाजी सहकारी कारखान्याला ११ कोटी ७ लाख रुपये कर्ज मंजूर झाले आहे.

विघ्नहर जुन्नर, जवाहर शेतकरी, छत्रपती शाहू कोल्हापूर, शरद नरंदे, कुंभारी- कासारी, दत्त इंडिया, शरयु अ‍ॅग्रो, आर. पवार शिरुर, जयवंत शुगर, विश्वासराव शुगर,संजीवनी अहमदनगर, भाऊराव चव्हाण नांदेड, एस.एम. मंडलिक, लोकनेते सुुंदरराव सोळंखे, किसनवीर सातारा,सद्गुरु सांगली, सिद्धी शुगर, पूर्णा हिंगोली, समर्थ, प्रसाद शुगर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, पराग अ‍ॅग्रो,संत तुकाराम, अशोक अहमदनगर, किसनवीर खंडाळा, उटेक शुगर, भाऊराव चव्हाण युनिट-२, धाराशिव युनिट-१, पूर्णा हिंगोली युनिट-२, तुकाई हिंगोली, समर्थ युनिट-२, काडवा नाशिक, छत्रपती माजलगाव, भाऊराव चव्हाण युनिट-३, राजगड सहकारी, श्री.क्रांती शुगर, ग्रीन पॉवर शुगर, धाराशिव युनिट-२ या सहकारी साखर कारखान्यांना कर्ज मंजूर केले आहे.

महिनाअखेर मुदत- यापैकी १८ साखर कारखान्यांनी १६९ कोटी ६८ लाख ७५ हजार रुपये कर्ज उचलले असून, अन्य कारखान्यांना राज्य शासनाचे हमीपत्र, कारखान्याकडून अन्य कागदपत्रे सादर झाल्यानंतर कर्ज वितरीत केले जाणार आहे. ३१ मेपर्यंत कर्ज उचलण्यास साखर आयुक्तांनी मुदत दिली आहे. 

जिल्हा बँक देणार दोन कारखान्यांना कर्ज - सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने बबनराव शिंदे शुगर तुर्कपिंपरी या कारखान्याला २४ कोटी ५४ लाख ९५हजार रुपये कर्ज दिले असून, आणखीन एका कारखान्याला कर्ज मंजूर केले जाणार आहे. सोलापूर जिल्हा बँकेने मात्र रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग या बँकांनाही सहकर्जदार म्हणून घेतल्याचे सांगितले. 

टॅग्स :SolapurसोलापूरSugar factoryसाखर कारखानेBanking Sectorबँकिंग क्षेत्रbankबँक