शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात ६७ नवीन जिल्ह्यांची मागणी, ११३ नवीन तालुक्यांचीही मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2018 05:37 IST

राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे.

- मिलिंदकुमार साळवेअहमदनगर - राज्यातील अहमदनगर, बीडसह विविध जिल्ह्यांमधून जिल्हा विभाजन व नवीन जिल्हानिर्मितीची मागणी होत असताना राज्यात नवीन ६७ जिल्हे निर्माण करण्याची मागणी राज्य सरकारकडे प्राप्त झाली आहे. याशिवाय राज्यात ११३ नवीन तालुके निर्माण करण्याची मागणीही सरकारकडे प्राप्त झाली आहे.महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी नागपूर येथे सुरू असलेल्या राज्य विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान विधान परिषदेत एका तारांकित प्रश्नाच्या लेखी उत्तरात नवीन जिल्हानिर्मिती व विभाजनाबाबत ही वस्तुस्थिती स्पष्ट केली. अहमदनगरच्या उत्तर विभागाचा स्वतंत्र जिल्हा निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे. त्याचे मुख्यालय श्रीरामपूर, संगमनेर की शिर्डी येथे करायचे आहे? यावरून अनेक वर्षांपासून या जिल्हा विभाजनाचे भिजत घोंगडे पडले आहे.जिल्हा विभाजनाबाबत निकष निश्चित करण्यासाठी महसूल विभागाच्या अपर मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित करण्यात आली होती. या समितीचा अहवाल सरकारला प्राप्त झाला आहे. त्यावर सरकार अभ्यास करीत आहे. अहवालाच्या तपासणीअंती धोरणात्मक निर्णय घेण्याची कार्यवाही सुरू आहे. मंत्रिमंडळाच्या मान्यतेने निश्चित केल्या जाणाऱ्या धोरणानुसार व निकषानुसार नाशिक जिल्ह्याचे, तसेच अन्य जिल्ह्यांचे विभाजन व पुनर्रचना करण्यासंदर्भात प्रकरणपरत्वे उचित निर्णय घेण्यात येणार आहे.अहमदनगर, बीडसह राज्यातील २४ जिल्ह्यांचे विभाजन करून ६७ नवीन जिल्हे निर्माण करण्याची, तसेच राज्यात ११३ नवीन तालुके नवीन करण्याची मागणी विविध माध्यमांद्वारे प्राप्त झाली आहे, असे महसूलमंत्र्यांनी उत्तरात स्पष्ट केले आहे.तालुका विभाजनाबाबत कोकण विभागाच्या महसूल आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली नेमलेल्या समितीच्या अहवालातील शिफारशींबाबत सर्व विभागीय आयुक्तांकडून अभिप्राय प्राप्त झाले आहेत. त्यानुसार निकष ठरविण्याची कार्यवाही सुरू आहे, असेही त्यांनी उत्तरात म्हटले आहे.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रMaharashtra Governmentमहाराष्ट्र सरकार