दहिसरमधून ६७ लाखांचे हिरे लंपास

By Admin | Updated: June 30, 2016 02:29 IST2016-06-30T02:29:55+5:302016-06-30T02:29:55+5:30

दहिसरमध्ये ६७ लाखांचे हिरे लंपास करुन एका इसमाने पळ काढला.

67 lakh diamond lamps from Dahisar | दहिसरमधून ६७ लाखांचे हिरे लंपास

दहिसरमधून ६७ लाखांचे हिरे लंपास


मुंबई : दहिसरमध्ये ६७ लाखांचे हिरे लंपास करुन एका इसमाने पळ काढला. याप्रकरणी दहिसर पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला असून अधिक चौकशी सुरू आहे.
बीकेसी परिसरात जयेश शाह (नावात बदल) यांची हिऱ्यांची कंपनी आहे. काही दिवसांपूर्वी एक इसम त्यांच्याकडे हिरे विकत घेण्यासाठी आला. त्याने हिरे निवडले. त्याची किंमत ६७ लाख रुपये होती. ते हिरे घेऊन त्याने शाह यांना बोरिवलीच्या वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेट परिसरात बोलवले. शाह तिथे गेले तेव्हा माझ्याकडे पैसे कमी आहेत तेव्हा आज तुम्ही मला हिरे द्या, मी तुम्हाला उद्या पैसे देतो असे त्याने शाह यांना सांगितले. मात्र शाह यांनी त्याला रोकड देऊन हिरे नेण्यास सांगितले आणि ते कंपनीत परतले. शाह यांना पुन्हा त्या इसमाचा फोन आला. त्यावेळी मात्र त्याने स्वत:कडे ६७ लाख रुपये असल्याचे सांगत पुन्हा हिरे पाठविण्याची विनंती केली. मात्र शाह दुसऱ्या कामात असल्याने त्यांनी त्यांच्या एका माणसाला हिरे घेऊन पाठविले.
तो माणूस वर्धमान इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये पोहोचताच भामट्याने त्याला रिक्षात बसवले आणि एका ठिकाणी नेले. तिथे त्याच्याकडून हिरे घेतले आणि रिक्षाचे पैसे देऊन तू जवळच असलेल्या इमारतीच्या पहिल्या मजल्यावर ये, तिथे तुझे पैसे देतो असे सांगून तो पसार झाला. दहिसर पोलिसात तक्रार दाखल आाहे.

Web Title: 67 lakh diamond lamps from Dahisar