कारमध्ये आढळली 66 लाखांची रोकड

By Admin | Updated: September 18, 2014 02:24 IST2014-09-18T02:24:59+5:302014-09-18T02:24:59+5:30

नांदुरा नाक्यावर मंगळवारी सायंकाळी नाकाबंदीदरम्यान पोलिसांना मारुती कारमध्ये तब्बल 66 लाखांची रोकड आढळून आली़ पोलिसांनी रकमेसह तिघांना ताब्यात घेतले आह़े

66 lakhs cash found in the car | कारमध्ये आढळली 66 लाखांची रोकड

कारमध्ये आढळली 66 लाखांची रोकड

मलकापूर (जि़ बुलडाणा) :  नांदुरा नाक्यावर मंगळवारी सायंकाळी नाकाबंदीदरम्यान पोलिसांना मारुती कारमध्ये तब्बल 66 लाखांची रोकड आढळून आली़ पोलिसांनी रकमेसह तिघांना ताब्यात घेतले आह़े विधानसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने राज्यात पैशांच्या वाहतुकीवर विविध प्रशासकीय विभागांची करडी नजर राहणार असल्याचे या घटनेच्या पाश्र्वभूमीवर स्पष्ट झाले आह़े 
शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक दीपक वळवी व वाहतूक शाखेचे प्रमुख नीलेश पुंडे हे राष्ट्रीय महामार्गावर वाहनांची तपासणी करीत असताना त्यांना मारुती कारच्या (एम.एच. 31-ईए 2411) डिक्कीमध्ये 66 लाख 46 हजार 913 रुपयांची रोकड सापडली़ या रकमेबाबत कारमधील नितीन 
दिवाकर अल्ती (38), आनंद माणिकराव मेश्रम (29) व स्वप्नील प्रकाश जुमडे (38 तिघेही रा. नागपूर) यांच्याकडे चौकशी केली असता त्यांनी समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे पोलिसांनी तिघांनाही ताब्यात घेतले आहे. 
दरम्यान, त्या तिघांनी सदर रक्कम पॅनकार्ड क्लब लि. कंपनीची असल्याचे सांगितले असून, सदर कंपनीवर सेबीची चौकशी सुरू असल्याने कंपनीचे बँकिंग व्यवहार बंद आहेत. त्यामुळे आम्ही मागील महिन्यात जमा असलेली रक्कम घेऊन जात असल्याचे सांगितले असले तरी पोलिसांना ही बाब न पटल्याने त्यांनी तिघांनाही ताब्यात घेतले आह़े (प्रतिनिधी)
 
हिंगोलीमध्ये दोन लाख जप्त
च्नांदेड मार्गावर वारंगा शिवारात पोलिसांनी एका कारमधून 2 लाखांच्या रकमेसह दोघांना ताब्यात घेतले आह़े आखाडा बाळापूर पोलिसांनी बुधवारी दुपारी 12.3क्च्या सुमारास ही कारवाई केली. 
च्कारमालक त्र्यंबकराव कुलकर्णी, चालक विठ्ठलराव होगे (दोघे रा.परभणी) यांची चौकशी केली असता सदर रकमेबाबत त्यांना समाधानकारक खुलासा करता आला नाही. तर ही रक्कम मंदिराच्या बांधकामासाठी नेण्यात येत असल्याचे चालक होगे याने सांगितले. 

 

Web Title: 66 lakhs cash found in the car