सांगली जिल्ह्यात ६४ उमेदवारांचे अर्ज दाखल
By Admin | Updated: September 27, 2014 00:11 IST2014-09-27T00:04:07+5:302014-09-27T00:11:52+5:30
विधानसभा निवडणूक : आज अंतिम दिवस असल्याने गर्दी होणार

सांगली जिल्ह्यात ६४ उमेदवारांचे अर्ज दाखल
सांगली : विधानसभा निवडणुकीसाठी आज (शुक्रवारी) जिल्ह्यातील आठही विधानसभा मतदारसंघात ६२ उमेदवारांनी १०४ उमेदवारी अर्ज दाखल केले. दरम्यान, उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा उद्या (शनिवारी) शेवटचा दिवस असल्यामुळे अर्ज दाखल करण्यास गर्दी होण्याची शक्यता आहे.
मिरज विधानसभेसाठी आज सहाजणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये प्रतीक्षा सोनवणे, सुरेश खाडे, सदाशिव वाघमारे आदींचा समावेश आहे. सांगली विधानसभेसाठी बारा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये अंकुश घुले, सचिन पवार, धनंजय गाडगीळ, संभाजी पवार, नसीम महात, मदन पाटील आदींचा समावेश आहे. इस्लामपूरमध्ये सहाजणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये हंबीरराव पाटील, विलासराव रकटे, उदयसिंह पाटील आदींचा समाावेश आहे. शिराळ्यामधून तिघांनी अर्ज दाखल केले. यामध्ये मोहन ऐतवडेकर, शिवाजीराव नाईक यांचा समावेश आहे. पलूस-कडेगावसाठी सहा जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. यामध्ये मोहनराव कदम, विलास कदम, डॉ. पतंगराव कदम आदींचा समावेश आहे. खानापूरसाठी सहा अर्ज दाखल झाले. यामध्ये गोपीचंद पडळकर, बाबासाहेब कदम, सदाशिवराव पाटील आदींचा समावेश आहे. तासगावसाठी दहा जणांनी उमेदवारी दाखल केले. यामध्ये आर. आर. पाटील, आनंदराव पवार, विजयकुमार सगरे, अशोक माने, महेश खराडे आदींचा समावेश आाहे. जतसाठी दहा जणांनी अर्ज दाखल केले. यामध्ये पिरगोंडा पाटील, सुभाष शिंदे, रमेश पाटील, विलासराव जगताप आदीचा समावेश आहे. आजअखेर जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात ९५ उमेदवारांनी १५७ उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. त्याचबरोबर १५४ अर्जांची विक्री झाली आहे.
दरम्यान, शनिवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे. या दिवशी अर्ज दाखल करण्यासाठी इच्छुकांकडून गर्दी होण्याची शक्यता आहे. (प्रतिनिधी)
आज अर्ज भरलेले प्रमुख उमेदवार
डॉ. पतंगराव कदम (काँग्रेस : पलूस-कडेगाव), आर. आर. पाटील (राष्ट्रवादी : तासगाव-कवठेमहांकाळ), शिवाजीराव नाईक (भाजप : शिराळा), सदाशिवराव पाटील (काँग्रेस : खानापूर-आटपाडी), मदन पाटील (काँग्रेस : सांगली), गोपीचंद पडळकर (भाजप : खानापूर-आटपाडी), सुरेश शेंडगे (काँग्रेस : तासगाव-कवठेमहांकाळ), संभाजी पवार (अपक्ष : सांगली), सुधीर गाडगीळ (भाजप : सांगली), विलासराव जगताप (भाजप : जत), विक्रम सावंत (काँग्रेस : जत), प्रभाकर जाधव (राष्ट्रवादी : जत), विक्रम पाटील (भाजप : इस्लामपूर), सी. आर. सांगलीकर (काँग्रेस : मिरज).