नदीसुधारणाचा ६३८ कोटींचा आराखडा केंद्र शासनाकडे

By Admin | Updated: June 2, 2014 22:49 IST2014-06-02T22:03:22+5:302014-06-02T22:49:47+5:30

शहरातील मुळा-मुठा नदीसुधारणेसाठी महापालिकेने जपान सरकारच्या सहकार्याने सुमारे ६३८ कोटींचा आराखडा तयार केला.

638 crores of river improvement will be planned by the central government | नदीसुधारणाचा ६३८ कोटींचा आराखडा केंद्र शासनाकडे

नदीसुधारणाचा ६३८ कोटींचा आराखडा केंद्र शासनाकडे

पुणे : शहरातील मुळा-मुठा नदीसुधारणेसाठी महापालिकेने जपान सरकारच्या सहकार्याने सुमारे ६३८ कोटींचा आराखडा तयार केला. केंद्र शासनाच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
केंद्र शासनाच्या जवाहरलाल नेहरू नागरी पुनरुत्थान योजने अंतर्गत पुण्यातील नदीसुधारणेचे काम सुरू आहे. त्याविषयीची वस्तुस्थिती काय आहे, असा प्रश्न आमदार शरद रणपिसे यांनी विधान परिषदेत आज विचारला. त्यावेळी महापालिकेने सुमारे ६३८ कोटींचा आराखडा तयार केला आहे. त्यामध्ये केंद्र शासन ७० टक्के, राज्य शासन २० टक्के आणि महापालिका १० टक्के वाटा उचलणार होते. मात्र, राज्य शासनाने २० टक्के वाटा उचलण्यास असमर्थता दर्शविली. मात्र, महापालिकेने ३० टक्के वाटा उचलण्याची तयारी दाखविली आहे. त्यामुळे गेल्या वर्षी राज्य शासनामार्फत नदीसुधारणाचा आराखडा केंद्र शासनाच्या नॅशनल रिव्हर कॉनजरवेशन डारेक्टर (एनआरसीडी) पाठविला आहे. शासनाच्या मंजुरीनंतर अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले.

Web Title: 638 crores of river improvement will be planned by the central government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.