मूर्तींच्या विल्हेवाटीवर ६२ लाखांचा खर्च
By Admin | Updated: August 7, 2014 01:00 IST2014-08-07T01:00:54+5:302014-08-07T01:00:54+5:30
गणेशोत्सवात मूर्तींचे विसर्जन व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला गेल्या वर्षात ६२,६४,२४२ चा खर्च करावा लागला. माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.

मूर्तींच्या विल्हेवाटीवर ६२ लाखांचा खर्च
महापालिका : पीओपीच्या मूर्तींच्या विक्रीवर बंदीची मागणी
नागपूर : गणेशोत्सवात मूर्तींचे विसर्जन व विल्हेवाट लावण्यासाठी महापालिकेला गेल्या वर्षात ६२,६४,२४२ चा खर्च करावा लागला. माहिती अधिकारात मनपाच्या आरोग्य विभागाकडून ही माहिती मिळाली आहे.
विसर्जनामुळे होणाऱ्या प्रदूषणाला आळा घालण्यासाठी गणेशोत्सवात मूर्तीची विल्हेवाट लावण्यासाठी ठिकठिकाणी कृत्रिम तळे, फलक, सफाई, वाहतूक, सुरक्षा व्यवस्था व जाहिरातीवर हा खर्च करण्यात आला आहे. पीओपी मूर्तींमुळे मनपा तिजोरीवर अतिरिक्त बोजा पडत आहे. त्यामुळे या मूर्तीच्या विक्र ीवर मनपाने बंदी घालावी, अशी मागणी प्लॅस्टर आॅफ पॅरिस मूर्तीविरोधी कृती समिती(पीओपी)ने केली आहे. याबाबत समितीचे शिष्टमंडळ महापौरांना निवेदन देणार असल्याची माहिती पदाधिकाऱ्यांनी दिली.
गणेशोत्सव आला की दरवर्षी पीओपी मूर्तींचा मुद्दा उपस्थित होतो. २६ आॅगस्ट २०१३ ला मनपाच्या अप्पर आयुक्तांनी सुनावणीत सर्वं आक्षेप फेटाळले होते. परंतु बंदीबाबतचा निर्णय घेण्याचे अधिकार नसल्याने मनपाने अहवाल शासनाकडे मंजुरीसाठी पाठविला. शासनाकडे हा प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे मनपाच्या भूमिकेकडे लोकांचे लक्ष लागले आहे. (प्रतिनिधी)