राज्यातील ६११ प्राथमिक आरोग्य केंद्रे टाकणार कात
By Admin | Updated: February 19, 2015 00:13 IST2015-02-19T00:13:26+5:302015-02-19T00:13:26+5:30
४१३चे नूतनीकरण तर १९८ केंद्राचे होणार नव्याने बांधकाम.
_ns.jpg)
राज्यातील ६११ प्राथमिक आरोग्य केंद्रे टाकणार कात
सचिन राऊत/अकोला : सार्वजनिक आरोग्य विभाग व कुटुंबकल्याण विभागाद्वारे राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानास प्रारंभ करण्यात आला असून, याअंतर्गत राज्यातील ६११ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांचे (यूपीएचएस) नूतनीकरण व बांधकामाचा श्रीगणेशा बुधवारी करण्यात आला. आरोग्य सेवेला नवसंजीवनी देण्यासोबतच शहरी रुग्णांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा देण्याच्या उद्देशाने हे पाऊल उचलण्यात आले आहे.
राज्यातील ४९३ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ३७ नागरी आरोग्य रुग्णालयांचे नूतनीकरण करण्यात येणार आहे. तसेच १९८ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रे व ८ नागरी आरोग्य रुग्णालयांचे नव्याने बांधकाम करण्यात येणार आहे. यासोबतच नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये मनुष्यबळही वाढविण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रांसाठी औषधे, इतर साहित्य, साधने तसेच इतर उपकरणांसाठी निधीची तरतूद करण्यात येणार असून कर्मचार्यांनाही विविध प्रकारचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
*क्षयरूग्णांनाही मिळणार अद्ययावत सुविधा
एमडीआर आणि एक्सडीआर क्षयरोगग्रस्त रुग्णांना विविध प्रकारच्या सुविधा या माध्यमातून देण्यात येणार आहेत. क्षयरोग असलेल्या रुग्णांना पूरक पोषण आहार देण्यासाठी ह्यआरोग्यवर्धिनीह्ण हा प्रकल्प राज्यभर राबविण्यात येणार आहे.
*आशा स्वयंसेविका व महिला समिती
नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र व रुग्णालयांमध्ये ५ हजार ८४४ आशा स्वयंसेविका कार्यरत होणार असून, रुग्णालय व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये ८ हजार २0 महिला आरोग्य समिती स्थापन करण्यात येणार आहेत.