शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील बसस्थानकांसाठी एमआयडीसीने दिले ६०० कोटी - मंत्री उदय सामंत 

By मनोज मुळ्ये | Updated: July 19, 2024 14:48 IST

पाली बसस्थानकाचे लोकार्पण उत्साहात

रत्नागिरी : राज्यातील १९३ बसस्थानकांसाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपये दिले आहेत. त्यात लोकार्पण होणारे पाली (ता. रत्नागिरी) हे सर्वात पहिले बसस्थानक आहे, असे उद्गार उद्योगमंत्री व रत्नागिरीचे पालकमंत्री उदय सामंत यांनी काढले. राज्य सरकार राबवत असलेल्या असंख्य लोकोपयोगी योजनांमुळे विरोधकांना पोटशूळ उठला असल्याची टीकाही त्यांनी केली.मुंबई गोवा महामार्ग आणि रत्नागिरी नागपूर महामार्ग यावरील पाली हे एकमेव बसस्थानक आहे. भविष्यात अधिक महत्त्व येणार असल्याने हे स्थानक नव्याने बांधण्यात आले आहे. त्याचे लोकार्पण शुक्रवारी मंत्री उदय सामंत यांच्याहस्ते झाले. यावेळी एस. टी. महामंडळाचे रत्नागिरी विभाग नियंत्रण प्रश्रेश बोरसे, कार्यकारी अभियंता मीनल सोनावणे, पंचायत समितीचे माजी सभापती महेश तथा बाबू म्हाप, गोकुळ दूधचे संचालक मुरलीधर जाधव, पालीचे सरपंच विठ्ठल सावंत, उपसरपंच संतोष धाडवे, संतोष सावंतदेसाई यांच्यासह अनेक अधिकारी, पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडेच परिवहन खाते आहे. बसस्थानकांसाठी एमआयडीसीकडून निधी देण्याची सूचना त्यांनी आपल्याला केली. राज्यात १९३ बसस्थानकांचे काम हाती घेण्यात आले असून, त्यासाठी एमआयडीसीने ६०० कोटी रुपयांची तरतूद केली आहे. पाली बसस्थानकासाठी ३ कोटी ९२ लाख रुपये खर्च आला असून, जिल्ह्यातील अन्य स्थानिकांना ८० कोटी रुपये देण्यात आले आहेत, असे मंत्री सामंत यांनी सांगितले. सर्व स्थानकांची कामे सुरू असून, त्यात सर्वात प्रथम आपल्या गावातील बसस्थानकच पूर्ण झाले आहे, असे ते म्हणाले.

जिल्ह्यासाठी आपण ५० नियमित आणि ५० मिनी बस मंजूर केल्या आहेत. पण फक्त इमारती उभ्या करुन चालत नाहीत. त्याची देखभालही करावी लागते. स्थानकांवरील सर्व सुविधा नियमित आहेत की नाहीत, त्याकडे अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.पाली राज्यात आदर्श गाव बनवणारपाली स्थानकावर महिलांसाठी वातानुकूलीत हिरकणी कक्ष बनवण्यात आला आहे. पालीमध्येच आपण महिला बचत गटांसाठी वातानुकूलीत सभागृह तयार करत आहाेत. पालीतील तरुणांनी सवलतीचे व्यावसायिक कर्ज घेऊन उद्योजक व्हावे, असे आवाहन करतानाच त्यांनी पाली हे राज्यात आदर्श गाव ठरेल, अशा पद्धतीने योजना राबवण्याचे आश्वासन दिले.

टॅग्स :Ratnagiriरत्नागिरीUday Samantउदय सामंत