नाशिक : हरियाणातील बरवाल (हिस्सार) येथील बरवालानगर येथे बाबा रामपाल यांच्या आश्रमात दर्शनासाठी गेलेले पंचवटी, सिडकोसह नाशिक जिल्ह्यातील ६० नागरिक अडकले असून, दोन दिवसांपासून ते आश्रमातच अन्न पाण्यापासून होते, असे वृत्त आहे. बाबा रामपाल यांच्या अटकेनंतर गुरुवारी त्यांची चौकशीनंतर सुटका होण्याची शक्यता आहे.आश्रमाबाहेर हिंसाचार सुरू झाल्यानंतर पोलीस आश्रमातून निघणाऱ्या बाबा रामपाल समर्थकांवर लाठीमार करीत होते, त्यामुळे नाशिकमधील त्यांच्या नातेवाईकांवर जीव मुठीत धरून जगण्याची वेळ आली होती. ४ नोव्हेंबरपासून आश्रमात असलेल्या नाशिकमधील भाविकांना एखादी चपाती खाऊन भूक भागवावी लागत आहे. या भाविकांनी महाराष्ट्र शासनाकडून मदत मागितली आहे. आश्रमात मंगळवारपर्यंत सुमारे दीड लाखाहून अधिक भाविक होते. बुधवारपर्यंत केवळ ४० हजार शिल्लक राहिले असून, त्यांना आश्रमातून बाहेर यायचे आहे; मात्र बाहेर आल्यावर पोलिसांच्या लाठीमाराला सामोरे जावे लागत असल्याने अनेक जण आश्रमातच आहेत. (प्रतिनिधी)
बाबा रामपाल आश्रमात ६० नाशिककर अडकले
By admin | Updated: November 20, 2014 02:24 IST