शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
2
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
3
निवडणूक आयोगाने आधारहीन म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, स्पष्टीकरणासह त्या दाव्यातील हवाच काढली
4
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
5
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
6
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
7
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
8
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
9
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
10
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी
11
राहुल गांधी यांचा सर्वात मोठा आरोप; मतचोरीचा पुरावा देत 'त्या' लोकांना थेट स्टेजवर बोलावले अन्...
12
सरकारी कर्मचारी-पेन्शनधारकांची दिवाळी होणार गोड! किती वाढणार पगार? मोठी अपडेट समोर
13
बेपत्ता महिला कॉन्स्टेबलची हत्या, कारमध्ये मृतदेह लपवला; आरोपी पोलिसाने सत्य सांगताच अधिकारी हैराण
14
Pune Firing: दुचाकीला साईड न दिल्याचे किरकोळ कारण; कोथरूड परिसरात निलेश घायवळ टोळीकडून गोळीबार, एक गंभीर जखमी
15
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांचं 'मत'चोरीला संरक्षण; राहुल गांधी यांचा गंभीर आरोप
16
'ऑपरेशन ३१३'चा भांडाफोड! ३००हून अधिक मदरसा कॅम्प बांधण्याची तयारी होती सुरू, जैशचा मोठा कट उघडकीस
17
सासऱ्याच्या मृत्यूनंतर सून ढसाढसा रडली, संशय येताच पोलखोल झाली; 'ते' सत्य लपवण्यासाठी...
18
महाराष्ट्रातील या मतदारसंघात झाली मतचोरी, हजारो मतदार वाढले, राहुल गांधींचा पुराव्यानिशी सनसनाटी आरोप 
19
सेफ्टीमध्ये 'TATA'च एक नंबर, सलग नवव्या गाडीला मिळालं 5 स्टार रेटिंग; कोणती आहे कार?
20
जगातील सर्वात महान कर्णधार कोण? किरॉन पोलार्डनं 'या' दिग्गजाचं घेतलं नाव!

नागपूरमध्ये होणाऱ्या नाट्यसंमेलनाची कार्यक्रम पत्रिका जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2019 09:56 IST

99 व्या नाट्यसंमेलनाची  कार्यक्रम पत्रिका जाहीर 

- अजय परचुरे 

मुंबई : 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाची उत्सुकता आता शिगेला पोहचली आहे. 22 फेब्रुवारीला नागपूरमध्ये 99 व्या अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनाचे मोठ्या थाटामाटात उदघाटन होणार आहे . 

22 फेब्रुवारीला दुपारी 3 वाजता नागपूर शहरात वाजत गाजत नाट्य दिंडीने संमेलनाची सुरवात होणार आहे . नंतर संध्याकाळी 99 व्या नाट्य संमेलनाचे उदघाटन ज्येष्ठ नाटककार महेश एलकुंचवार ह्यांच्या हस्ते होणार आहे . ह्यावेळी मंचावर , 99 व्या नाट्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष ज्येष्ठ नाटक कार प्रेमानंद गज्वी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे प्रमुख पाहुणे , स्वागताध्यक्ष आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि नाट्यपरिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी असणार आहेत . 22 फेब्रुवारीला संध्याकाळी उदघाटन झाल्यानंतर 25 फेब्रुवारी पहाटे पर्यंत नागपूरच्या नाट्य नगरीत सलग कार्यक्रम होणार आहेत . 

पुन्हा 'सही रे सही' प्रमुख आकर्षण अभिनेता भरत जाधव ह्यांच्या अफलातून अभिनयाने गाजलेलं पुन्हा सही रे सही हे व्यावसायिक नाटक 99 व्या नागपूर नाट्य संमेलनाचे प्रमुख आकर्षण ठरणार आहे . तसेच आनंदवन येथिल विकास आमटे ह्यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या स्वरावानंदन ह्या संगीतमय कार्यक्रमाने 25 फेब्रुवारीला पहाटे नाट्यसंमेलनाचे सूप वाजणार आहे . ज्येष्ठ गायिका देवकी पंडित ह्यांच्या सुफी गीतांवर आधारित मुक्ती ह्या संगीतमय कार्यक्रमाची पर्वणीही नागपूरकरांना अनुभवायला मिळणार आहे . त्याचसोबत विदर्भातील गाजलेल्या झाडेपट्टी रंगभूमीवरील अस्सल नाटकाचा आस्वादही घेता येणार आहे . तसेच विदर्भातील महाविद्यालयीन तरुणांच्या गाजलेल्या एकांकिकाही संमेलनात सादर होणार आहेत . तसेच प्रेमानंद गजवी ह्यांची प्रकट मुलाखतही होणार आहे . 

विशेष मान्यवरांचा होणार सत्कार 99 व्या नाट्यसंमेलनात अनेक दिग्गज नाट्यकर्मींचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे . ज्येष्ठ नाट्यकर्मी , दिग्दर्शक आणि नुकताच पद्मश्री हा मानाचा पुरस्कार जाहीर झालेले वामन केंद्रे आणि नुकत्याच संपन्न झालेल्या संगीत नाटक अकादमी पुरस्कार सोहळ्यात विशेष पुरस्कार मिळवलेले लेखक अभिराम भडकमकर आणि लोककला अभ्यासक प्रकाश खांडगे ह्यांचा सन्मान करण्यात येणार आहे .

टॅग्स :98th Akhil Bharatiya Marathi Natya Sammelan९८ वे अखिल भारतीय मराठी नाट्यसंमेलनNatakनाटक