पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात ६ वर्षांच्या मुलीला सर्पदंश
By Admin | Updated: March 26, 2015 14:22 IST2015-03-26T11:10:08+5:302015-03-26T14:22:36+5:30
विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीला सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरात ६ वर्षांच्या मुलीला सर्पदंश
ऑनलाइन लोकमत
पंढरपूर, दि. २६ - विठ्ठल मंदिरात दर्शनासाठी रांगेत उभ्या असलेल्या सहा वर्षांच्या चिमुकल्या मुलीला सर्पदंश झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या चिमुरडीवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती स्थिर असल्याचे समजते. मात्र भाविकांची प्रचंड गर्दी असलेल्या या मंदिरात साप आढळल्याने खळबळ माजली आहे.
मंदिराची व गाभा-याची साफसफाई करताना सावधनता बाळगून नीट तपासणी करावी असे मत भाविकांनी व्यक्त केले आहेे.