स्वाइन फ्लूचे राज्यात ६ बळी
By Admin | Updated: October 1, 2015 00:42 IST2015-10-01T00:42:59+5:302015-10-01T00:42:59+5:30
राज्यात मंगळवारी स्वाइन फ्लूमुळे ६ मृत्यू झाले आहेत. यामध्ये पुण्यातील ४ जणांचा, तर नाशिक आणि अहमदनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे

स्वाइन फ्लूचे राज्यात ६ बळी
पुणे : राज्यात मंगळवारी स्वाइन फ्लूमुळे ६ मृत्यू झाले आहेत. यामध्ये पुण्यातील ४ जणांचा, तर नाशिक आणि अहमदनगर येथील प्रत्येकी एका रुग्णाचा समावेश आहे. यामुळे पुण्यातील स्वाइन फ्लूमुळे मृत्यू झालेल्या रुग्णांची संख्या ६२ वर गेली असून, नाशिकमधील बळींची संख्या ६१ व अहमदनगरमधील बळींची संख्या ३३ वर गेली आहे. राज्यातील एकूण बळींची संख्या त्यामुळे ७५८ वर गेली आहे.
मंगळवारी राज्यभरात ८९५३ जणांची स्वाइन फ्लूसाठी तपासणी करण्यात आली. त्यातील
४५५ संशयितांना आॅसेलटॅमिवीर हे औषध देण्यात आले, तर ४१
जणांना लागण
झाल्याचे निदान झाले. मंगळवारी या आजारामुळे २५० जण रुग्णांलयांत भरती होते. त्यातील २४ जणांना व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले आहे.
हवामानात सातत्याने होणाऱ्या बदलांमुळ स्वाइन फ्लूच्या बळींची संख्या वाढत असून, नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन राज्य आरोग्य विभागाने केले आहे. (प्रतिनिधी)