परभणी जिल्ह्यातील 6 मजूर अपघातात ठार
By Admin | Updated: April 29, 2016 13:01 IST2016-04-29T13:01:21+5:302016-04-29T13:01:21+5:30
बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले

परभणी जिल्ह्यातील 6 मजूर अपघातात ठार
>ऑनलाइन लोकमत
बीड, दि. 29 - बीड जिल्ह्यात आष्टी शहराजवळ आष्टी-अहमदनगर मार्गावर टमटम आणि खाजगी बस मध्ये आज पहाटे ५ च्या सुमारास अपघात झाला. या अपघातात परभणी जिल्ह्यातील 6 मजूर ठार झाले आहेत. मयतामध्ये वाघलगाव, दिघोळ (ता. सोनपेठ) व खादगाव (ता गंगाखेड) येथील प्रत्येकी २ अशा ६ जणांचा समावेश आहे. सर्व जण दुष्काळामुळे काम शोधण्यासाठी मुंबई कडे निघाले होते. मयताची नावे अशी- अरुण गायकवाड ( वय ३५), निर्मला अरुण गायकवाड ( ४ वर्ष, दोघेही रा. वाघलगाव ), राजू खलसे (२८), आदित्य राजू खलसे (६ महिने, दोघेही रा. दिघोळ), बंडू जोगदंड (३०), केशरबाई बंडू जोगदंड (३१, दोघेही रा. खादगाव, ता गंगाखेड). मनिषा राजू खलसे (२३) या गंभीर जखमी आहेत. त्यांच्यावर अहमदनगर येथील सरकारी दवाखान्यात उपचार सुरु आहेत.