नाशिकमध्ये लुटलं तबब्ल ५८ किलो सोनं

By Admin | Updated: April 24, 2015 12:59 IST2015-04-24T12:57:35+5:302015-04-24T12:59:44+5:30

शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल ५८ किलो सोनं लुटल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे.

58 kg of gold lying in Nashik | नाशिकमध्ये लुटलं तबब्ल ५८ किलो सोनं

नाशिकमध्ये लुटलं तबब्ल ५८ किलो सोनं

 ऑनलाइन लोकमत

नाशिक, दि. २४ - शस्त्रांचा धाक दाखवत तब्बल ५८ किलो सोनं लुटल्याची खळबळजनक घटना नाशिकमध्ये घडली आहे. वाडीवरे गावाजवळ आज पहाटे चारच्या सुमारास ही लूट झाली. झी गोल्ड कंपनीची गाडी शिरपूरच्या रिफायनरीत हे सोनं नेत असताना दरोडेखोरांनी शस्त्रांचा धाक दाखवत गाडी थांबवली आणि ५८ किलोचं सोन घेऊन पोबारा केला. बाजाराभावाप्रमाणे आत्ता या सोन्याची किंमत १६ कोटी रुपये इतकी आहे.

याप्रकरणी घोटी पोलिस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस पुढील तपास करत आहेत. 

Web Title: 58 kg of gold lying in Nashik