शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
2
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
3
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
4
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
5
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
6
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
7
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
8
हा सदोष मनुष्यवधच!
9
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
10
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
11
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
12
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
13
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
14
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
15
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
16
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
17
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
18
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
19
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?

साठे महामंडळातील ५८ कर्मचारी बडतर्फ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 29, 2020 05:27 IST

अवैध भरती : रमेश कदम यांच्या कार्यकाळातील घोटाळा

यदु जोशी।लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : तब्बल ३५३ कोटी रुपयांच्या घोटाळ्यांनी गाजलेल्या लोकशाहीर अण्णा भाऊ साठे आर्थिक विकास महामंडळात अवैध भरती करण्यात आलेल्या ५८ कर्मचारी, अधिकाऱ्यांना बडतर्फ करण्यात आले आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या दणक्यानंतर महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक विक्रांत बगाडे यांनी आदेश काढले.

या ५८ कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्याचे आदेश मुंडे यांनी चार महिन्यांपूर्वी दिले होते. त्यातील सर्व कायदेशीर बाबी तपासून बगाडे यांनी कारवाईचा बडगा उचलला. या घोटाळ्यातील मुख्य आरोपी राष्ट्रवादीचे माजी आमदार रमेश कदम हे सध्या तुरुंगात आहेत.

ते महामंडळाचे अध्यक्ष असताना घोटाळ्यांवर घोटाळे झाले होते आणि त्यात कर्मचारी भरतीचाही समावेश होता. शैक्षणिक पात्रता न बघता, शासनाची कोणतीही मान्यता न घेता आणि भरतीची कायदेशीर प्रक्रिया न राबविताच या तब्बल ७४ कर्मचाºयांची महामंडळात भरती करण्यात आली होती. त्यातील ९ कर्मचाºयांनी ते कदम महामंडळात येण्यापूर्वी रोजंदारीवर नोकरीला लागले होते आणि आधीच्या असे कारण पुढे करत काही राजकीय नेत्यांच्या मदतीने स्वत:चा बचाव करून घेतला. त्यामुळे ते बडतर्फीच्या कारवाईतून तूर्त वाचले आहेत. तथापि, त्यांच्या बडतर्फीचा प्रस्तावही सामाजिक न्याय विभागाकडे प्रलंबित असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

७ कर्मचाºयांनी न्यायालयातून स्थगिती मिळवत बचाव करून घेतला.५८ जणांना मंगळवारी बडतर्फ करण्यात आले. त्यात उपमहाव्यवस्थापक वैशाली मुंदळे यांच्यासह मुंबई मुख्यालय, पुणे, नागपूर, लातूर, अमरावती, नाशिक आदी ठिकाणच्या महामंडळातील कर्मचाºयांचा समावेश आहे. विभागीय चौकशीत सात आरोप सिद्ध झालेल्या एका जिल्हा व्यवस्थापकास अभय मिळाले.१० लाखांपर्यंतची कर्जे दिलीरमेश कदमांच्या काळात नोकºया देताना आर्थिक घोटाळेदेखील झाले. बºयाच कर्मचाºयांना आधीच्या तारखेत रुजू झाल्याचे दाखवत महामंडळाकडून १० लाखांपर्यंतची कर्जे दिली. नोकरी लावून देण्याच्या मोबदल्यात स्वीकारली गेली असा आरोप असून सीआयडी चौकशीत ही बाब समोर आली आहे. त्यात रमेश कदमचे निकटवर्ती/नातेवाइक तसेच महामंडळातील काही कर्मचारी/अधिकाºयांचाही समावेश होता.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसRamesh Kadamरमेश कदम