नाशिकमध्ये म्हाडाची ५७७ घरे
By Admin | Updated: July 15, 2015 00:49 IST2015-07-15T00:49:58+5:302015-07-15T00:49:58+5:30
म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ५७७ घरांचा समावेश असलेली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्जदारांना २९ जुलैपर्यंत नाशिक मंडळामध्ये अर्ज सादर करता येणार आहे.

नाशिकमध्ये म्हाडाची ५७७ घरे
मुंबई : म्हाडाच्या नाशिक मंडळातर्फे ५७७ घरांचा समावेश असलेली जाहिरात प्रसिद्ध केली आहे. अर्जदारांना २९ जुलैपर्यंत नाशिक मंडळामध्ये अर्ज सादर करता येणार आहे. आडगाव, पाथर्डी, म्हसरूळ, मखमलाबाद आणि पंचक येथील घराचे अर्ज अर्जदारांना मंडळाच्या कार्यालयात जमा करावे लागणार आहेत. आडगाव येथील अत्यल्प उत्पन्न गटातील ११२, अल्प उत्पन्न गटातील ६५ आणि मध्यम उत्पन्न गटातील ८९ घरांचा समावेश आहे. तसेच पाथर्डी आणि मखमलाबाद येथील अनुक्रमे ३३ आणि १0१ घरांचा समावेश आहे. पंचक येथील अल्प उत्पन्न गटातील १३३ आणि म्हसरूळ येथील मध्यम उत्पन्न गट १ आणि मध्यम उत्पन्न २ मधील अनुक्रमे ३३ आणि ११ घरांचा समावेश आहे.