५६ सफाई कर्मचारी बेपत्ता
By Admin | Updated: July 6, 2014 00:45 IST2014-07-06T00:27:28+5:302014-07-06T00:45:17+5:30
अकोला महापालिकेच्या आस्थापनेवरील ५६ सफाई कर्मचारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

५६ सफाई कर्मचारी बेपत्ता
अकोला : महापालिकेच्या आस्थापनेवरील ५६ सफाई कर्मचारी बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती उजेडात आली आहे. प्रशासनाने सफाई कर्मचार्यांचे दस्तऐवजांचा शोध घेतला असता, ही बाब समोर आली. शहरात दैनंदिन साफसफाई करण्यासाठी मनपाच्या आस्थापनेवरील ७४८ सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. धार्मिक उत्सव वगळता शहरात कधीही नेमाने साफसफाई होत नाही. यावर अनेकदा सभागृहात नगरसेवकांनी चर्चाही केली. ही बाब लक्षात घेता,आयुक्त डॉ.महेंद्र कल्याणकर यांनी सफाई कर्मचार्यांची शोध मोहीम हाती घेतली आहे. यात चक्क ५६ कर्मचारी बेपत्ता असताना त्यांच्या नावे वेतन काढल्या जात असल्याचा प्रकार उजेडात आला. याप्रकरणी प्रशासन गंभीर असून हा ह्यलुपाछुपीह्णचा खेळ करणार्यांवर कठोर कारवाईचे संकेत उपायुक्त दयानंद चिंचोलीकर यांनी दिले आहेत. ** अशी केली तपासणी सामान्य प्रशासन विभागाने सफाई कर्मचार्यांची झोननिहाय तपासणी केली. त्यानंतर ह्यपे-रोलह्ण तपासून आधार कार्ड, बँकेचे पासबुक व सेवा पुस्तिकेची प्रत व संबंधित कर्मचार्याचे फोटो जमा केले. यादरम्यान, ५६ कर्मचार्यांचे दस्तऐवज अद्यापही सादर झाले नसून, सूचना देऊनही ते समोर आले नाहीत.