शहरं
Join us  
Trending Stories
1
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
2
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
3
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
4
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला 3 मुल तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
5
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
6
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
7
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
8
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
9
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
10
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
11
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
12
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
13
कोण आहे ५ कोटींचे बक्षीस असलेला मिसिर बेसरा? ज्याच्या खात्म्यासाठी ३ हजार जवानांचा जंगलाला वेढा
14
३,००० कोटींचे कंत्राट मिळताच डिफेन्स शेअरमध्ये ५%ची उसळी; वर्षात गुंतवणूकदारांना १७७०% परतावा
15
तामिळनाडू, केरळ, आसाम, बंगालमध्ये समीकरणे बदलली, कोण बाजी मारणार? धक्कादायक ओपिनियन पोल
16
Anjali Damania : अजित पवारांच्या अपघातादिवशी भोंदू खरातच्या मोबाईलवर १९ मेसेज; अंजली दमानिया यांचा दावा
17
१ घर, एक कर्मचारी अन् AI ची जादू; १८ लाख गुंतवून तब्बल २८ कोटींची कमाई करतोय 'हा' युवक
18
नव्या कामगार कायद्यानं ग्रॅच्युईटी वाढणार; काय आहे नवा फॉर्म्युला, कोणावर किती होणार परिणाम?
19
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
20
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
Daily Top 2Weekly Top 5

राज्यातील ५६ टक्के बालके, महिला रक्तक्षयामुळे त्रस्त; राष्ट्रीय कुटुंब सर्वेक्षणात समोर आली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2020 05:49 IST

National Family Survey : देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते.

  - बाबूराव चव्हाण

उस्मानाबाद : पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा केली आहे. असे असतानाच दुसरीकडे महाराष्ट्रात ५६ टक्के बालके, गराेदर माता आणि महिला रक्तक्षयाने (ॲनिमिया) त्रस्त आहेत. ही धक्कादायक बाब नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या राष्ट्रीय कुटुंब आराेग्य सर्वेक्षणाच्या (एएफएचएस-५) अहवालातून उजेडात आली आहे. 

देशभरातील कुटुंबांचे दर चार वर्षांनी सर्वेक्षण केले जाते. यापूर्वी २०१५-१६ मध्ये सर्वेक्षण झाले हाेते. या सर्वेक्षणातून राज्यातील ६ ते ५९ महिन्यांच्या आतील बालके, १५ ते ५९ वयाेगटातील महिला आणि गराेदर मातांमध्ये रक्तक्षयाचे प्रमाण सरासरी ५०.३ टक्के एवढे हाेते. मात्र, आता हेच प्रमाण थेट ५६.३६ टक्क्यांवर पोहोचले आहे. 

म्हणजेच रक्तक्षयाने त्रस्त असणाऱ्यांचे प्रमाण ६ टक्क्यांहून अधिक वाढले आहे. ‘ॲनिमियामुक्त भारत’ ही घाेषणा आणि जिल्हास्तरीय यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या उपाययाेजनांवर यामुळे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे महिला आणि बालके यांच्या आरोग्याकडे होत असलेले दुर्लक्ष पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. 

बालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ६८.९ टक्क्यांवरबालकांतील रक्तक्षयाचे प्रमाण ५३.८ टक्के एवढे हाेते. यामध्ये वाढ हाेऊन ते ६८.९ टक्क्यांवर गेले आहे. महिलांतील रक्तक्षयाचे प्रमाण ४७ टक्क्यांवरून थेट ५४.५ टक्के एवढे झाले आहे. गराेदर मातांतील  रक्तक्षयाचे प्रमाण काहीअंशी खाली आले असले तरी फारसे समाधानकारक नाही. चार वर्षांपूर्वी ४९.३ टक्के गराेदर माता रक्तक्षयाने त्रस्त हाेत्या. तर ताज्या अहवालानुसार ४५.७ टक्के मातांमध्ये रक्तक्षय आढळून आला आहे. 

दृष्टिक्षेपात महाराष्ट्र...रक्तक्षय    एनएफएचएस-४    एनएफएचएस-५बालके           ५३.८    ६८.९ टक्केमहिला     ४७    ५४.५ टक्केगराेदर माता    ४९.३    ४५.७ टक्के

असे हाेतात दुष्परिणामलहान मुले : कुपाेषण वाढीस लागून वाढ खुंटणे, वारंवार आजारी पडणे, खेळण्याची क्रियाशीलता कमी हाेणे, अभ्यासावरील लक्ष कमी हाेणे, वारंवार थकवा येणे, बालमृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता असते.गराेदर माता : रक्तक्षयाचे प्रमाण वाढल्यास गर्भपात हाेणे, कमी दिवसांची प्रसूती, गर्भारपणात रक्तदाब वाढणे, वारंवार जंतुसंसर्ग हाेणे, प्रसूतिदरम्यान रक्तस्राव हाेणे, कमी वजनाचे बाळ जन्माला येणे, बाळंतपण व बाळंतपणानंतर अन्य आजारांची लागण हाेते. यातूनच माता मृत्यूचा धाेका ओढावण्याची शक्यता बळावते. 

टॅग्स :Healthआरोग्यMaharashtraमहाराष्ट्र