शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात पाचव्या टप्प्यात 56.89 टक्के मतदान, सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2024 16:37 IST

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे.

मुंबई : मुंबईसह राज्यातील १३ मतदारसंघांत पाचव्या टप्प्यात सोमवारी झालेल्या मतदानात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती रात्री उशिराने निवडणूक आयोगाने जाहीर केली. यात सर्वाधिक मतदान दिंडोरी मतदारसंघात एकूण ६६.७५ टक्के तर सर्वात कमी मतदान दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के झाले आहे. विधानसभानिहाय मतदारसंघात पाचव्या टप्प्यात दिंडोरी विधानसभा क्षेत्रात सर्वाधिक ७५.४२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. तर सर्वात कमी मतदान हे मुंबईतील कुलाबा विधानसभा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे.

राज्यात मतदान केंद्रावर रात्री उशिरापर्यंत मतदानाची प्रक्रिया पार पडली. मंगळवारी अंतिम आकडेवारी जाहीर करण्यात आली.  त्यानुसार पाचव्या टप्प्यात एकूण ५६.८९ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीनुसार १३ मतदारसंघापैकी सर्वाधिक मतदान हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघात झाले आहे. या मतदारसंघात ६६.७५ टक्के मतदान पूर्ण झाले आहे. तर धुळे मतदारसंघात ६०.२१ टक्के मतदान झाल्याची नोंद करण्यात आली आहे. निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार या १३ मतदारसंघातील जवळपास चार मतदारसंघात ६० आणि ६० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाल्याचे यावेळी आकडेवारीतून कळते. कल्याण लोकसभा मतदारसंघ आणि मुंबई दक्षिण लोकसभा मतदारसंघात केवळ ५० टक्क्यांपर्यंत मतदानाचा टक्का पोहोचला आहे. कल्याण मतदारसंघात ५०.१२ टक्के तर दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात ५०.६ टक्के मतदान झाल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

सर्वात जास्त मतदान दिंडोरी विधानसभेत दिंडोरी विधानसभा मतदारसंघात ७५.४२ टक्के मतदान झाली आहे. या आकडेवारीनुसार एकूण ८ विधानसभा मतदारसंघांत ७० आणि ७० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झाले आहे. त्यात भिवंडी ग्रामीण ७२,६६ टक्के, डहाणू ७३.७५ टक्के, इगतपुरी ७२.२४ टक्के, कळवण ७०.८९ टक्के, पालघर ७०.३४ टक्के, शहापूर ७०२६ टक्के आणि विक्रमगड ७४.४५ टक्के मतदान झाल्याची माहिती आयोगाच्या आकडेवारीतून दिसून आली आहे.

... येथे ५० टक्क्यांपेक्षा कमी मतदानसर्वात कमी मतदान कुलाबा विधानसभा मतदारसंघात नोंदविण्यात आले आहे. कुलाबा मतदारसंघात ४३.६८ टक्के मतदान नोंदविण्यात आले आहे. या आठ मतदारसंघांत ऐरोली ४८.४७ टक्के, अंबरनाथ ४७.०७ टक्के, भिवंडी पूर्व ४९.८७ टक्के, चांदिवली ४९.४३ टक्के, कुलाबा ४३.६८ टक्के, धारावी ४८.५२ टक्के, मिरा भाईंदर ४८.९५ टक्के आणि मुंब्रा कळवा ४८.७२ टक्के मतदान झाल्याची माहिती समोर आली आहे. 

टॅग्स :lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Electionनिवडणूक 2024