शहरं
Join us  
Trending Stories
1
Chhagan Bhujbal: हेलिकॉप्टर हेलिपॅडऐवजी पार्किंगमध्ये का उतरवलं? स्वतः भुजबळांनी सांगितलं त्यामागचं कारण!
2
इराणची संपत्ती होणार मुक्त! अमेरिकेचा मोठा निर्णय; होर्मुझची सामुद्रधुनी पुन्हा खुली होणार?
3
'सुनेत्रा पवारांच्या जीवाला रुपाली चाकणकर यांच्याकडून धोका', एसआयटीकडे तक्रार, राजकारणात खळबळ
4
Travel : कशाला हवा परदेश? भारताच्या दक्षिण टोकावर दडलंय निसर्गाचं नंदनवन; पाहा ७ बेस्ट हिल स्टेशन्स
5
गुड न्यूज! आता चूक सुधारता येणार; Instagram ने आणलं 'एडिट' फीचर, टाईम लिमिट किती?
6
छगन भुजबळ थोडक्यात बचावले, पायलटने भलतीकडेच हेलिकॉप्टर उतरवले; अनर्थ टळला, नेमका प्रकार काय?
7
Varuthini Ekadashi 2026: भाग्य पालटणारा सोमवार! वरुथिनी एकादशीला 'या' राशींवर होणार विष्णू कृपेचा वर्षाव!
8
IPL 2026 PBKS vs SRH : अभिषेक शर्माची कडक फिफ्टी; SRH नं पॉवर प्लेमध्येच ठोकली सेंच्युरी
9
नियतीचा क्रूर खेळ! लग्नानंतर अवघ्या काही तासांत संसाराचा अंत; नवरा-नवरीसह ४ जणांचा मृत्यू
10
Share Market Holiday: मंगळवारी शेअर बाजारात ट्रेडिंग होणार नाही; कामकाज राहणार बंद, पाहा काय आहे यामागचं कारण?
11
२३ वर्षांनी महिला व बालकल्याण विभागाचे सक्षमीकरण, २,३३,००५ पदांना मान्यता; मेगा भरती होणार!
12
मुंबईत स्वस्तात मिळणार घरे, २८ एकरात उभी राहणार नवी टाउनशिप; मध्यमवर्गीयांसाठी सरकारचं 'गिफ्ट'
13
PBKS vs SRH : कोण आहे Praful Hinge? ईशान किशनच्या कॅप्टन्सीत विदर्भकराला पदार्पणाची संधी मिळणार?
14
आता तुमच्या सुट्ट्या वाया जाणार नाहीत! उरलेल्या सुट्ट्यांच्या मोबदल्यात मिळणार पैसा; नव्या कामगार कायद्यात काय?
15
Shocking: बापरे! फ्रीडायव्हिंग करताना शार्कनं जबड्यात पकडला पाय; पाहा अंगाचा थरकाप उडवणारा व्हिडिओ
16
मोबाईल विकला अन् बँक खाते रिकामे झाले? कानपूर पोलिसांनी उघडले सायबर गुन्हेगारीचे नवीन रॅकेट
17
डोसा प्रकरणात नवा ट्विस्ट, आजी-आजोबांवर संशय; २ मुलींच्या वडिलांनी पोलिसांना काय सांगितलं?
18
Video: फक्त २ वर्षातच मुलीने फेडलं ३० लाखांचं शैक्षणिक कर्ज; सांगितल्या ४ सोप्या ट्रीक
19
“शालेय वाहतूक अधिक सुरक्षित, पारदर्शक, उत्तरदायी करण्यास सरकार कटिबद्ध”: प्रताप सरनाईक
20
धक्कादायक! कोणीही मुली देईना, मच्छरांच्या त्रासामुळे 'या' गावातील मुलांचं लग्नच जमेना
Daily Top 2Weekly Top 5

जुलैतील अतिवृष्टीग्रस्तांना 554 कोटींचा दिलासा; सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला, सर्वात कमी जळगावला

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 19, 2021 13:16 IST

या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे.

नारायण जाधव - 

ठाणे : जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीचा मोठा फटका संपूर्ण राज्याला बसला होता. शेतपिकांच्या नुकसानीसह घरे, दारे, गुरे, ढोरे, गोठे यांच्या नुकसानासह दुकानांमध्ये पाणी शिरल्याने व्यापाऱ्यांचेही मोठे नुकसान झाले होते. अखेर दोन महिन्यांनी का होईना महाविकास आघाडी सरकारने या अतिवृष्टीग्रस्तांना देण्यात येणाऱ्या मदतीचा ५५४ कोटी ८७ लाख ५३ हजाराचा पहिला हप्ता गुरुवारी वितरित केला. या पहिल्या हप्त्यातील सर्वाधिक मदत कोल्हापूर जिल्ह्याला (१४८ कोटी ६७ लाख ६६ हजार रुपये) दिली असून, त्याखालोखाल सांगलीला (१३३ कोटी ७९ लाख ८९ हजार रुपये) मदत मिळाली आहे. विभागवार विचार करता सर्वाधिक रक्कम पुणे आणि कोकण विभागास तर सर्वात कमी नाशिक विभागास दिली आहे. यात जळगावच्या हातात तर अवघे ४० हजार टिकवले आहेत.कोकणातील ठाणे जिल्ह्याला ४२ कोटी ९० लाख ९४ हजार तर पालघर जिल्ह्याला दोन कोटी ६८ लाख ४४ हजार अशी ४५ कोटी ५९ लाख ३८ हजार, रायगडला ६० कोटी ४१ लाख ३६ हजार, रत्नागिरीला ४४ कोटी २९ लाख १७ आणि सिंधुदुर्गास सहा कोटी ९४ लाख ४५ हजार रुपयांची मदत दिली आहे.जुलैत कोल्हापूर, सांगली जिल्ह्याला अतिवृष्टीचा मोठा फटका बसला होता. दुकानांमध्ये पाणी शिरून व्यापारी वर्गाचे मोठे नुकसान झाले होते. कोल्हापुरात पंचगंगेने धोक्याची पातळी ओलांडल्याने अनेकांचे संसार वाहून गेले होते. या सर्वांना महाविकास आघाडी सरकारकडून मदतीचा हात मिळण्याची अपेक्षा होती.

विभागवार मदत व रक्कमपुणे विभाग : ३१६ कोटी ३८ लाख ४९ हजारकोकण विभाग : १५७ कोटी ७१ लाख ९९ हजारअमरावती विभाग : ६७ कोटी २४ लाख १८ हजारनागपूर विभाग :  १० कोटी ४८ लाख ४० हजारमराठवाडा विभाग : ३ काेटी ३ लाख ७ हजारनाशिक विभाग : १ लाख ४० रुपये 

टॅग्स :floodपूरkolhapurकोल्हापूरSangliसांगलीState Governmentराज्य सरकारMarathwadaमराठवाडा