शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वास्तव! महाराष्ट्रातील ५५ टक्के खेडी इंटरनेटविना

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2021 05:56 IST

देशात ४.५० लाख खेड्यांत नाही ऑप्टिकल फायबर. धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही.

- हरीश गुप्तालोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : देशातील सहा लाख खेडी आणि पंचायतींना ऑगस्ट २०२१ अखेर ऑप्टिकल फायबरने जोडण्याची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची महत्त्वाकांक्षी योजना साकार होण्याची चिन्हे नाहीत. यावर्षी जुलैपर्यंत ५.९८ लाख खेड्यांपैकी फक्त १.५० लाख ग्रामपंचायती भारत नेट प्रोजेक्टअंतर्गत जोडल्या गेल्या होत्या व ती टक्केवारी आहे सुमारे २५.

धक्कादायक म्हणजे ३७,४३९ खेड्यांमध्ये थ्री जी, फोर जी मोबाईल सेवा आजही नाही. अधिकृत सूत्रांकडील माहितीनुसार, महाराष्ट्रात २०१४ खेड्यांत थ्री जी, फोर जी मोबाईल टेलिफोन सेवा नाही आणि ४०,९५९ (५५ टक्के) खेड्यांत इंटरनेट सेवा नाही. इंटरनेट फक्त १९,०१३ खेड्यांत उपलब्ध आहे. सहा लाख खेड्यांपैकी फक्त ३० टक्के खेड्यांत इंटरनेट उपलब्ध आहे आणि अशा खेड्यांत राहणाऱ्या मुलांना विकसित खेड्यांतील मुलांच्या तुलनेत रिमोट एज्युकेशन फॅसिलिटीज नाहीत.

बिहारमधील ३९,०७३ खेड्यांपैकी ८,१६३ खेड्यांत इंटरनेट सेवा आहे. थ्री जी, फोर जी नेटवर्क सुविधेपक्षा ही परिस्थिती खूप चांगली आहे. फक्त ३२१ खेड्यांत फोर जी सेवा नाही. उत्तर प्रदेशमधील ९७,८१३ खेड्यांपैकी ६२० खेड्यांत ही सेवा नाही; पण इंटरनेटचा विचार केला तर उत्तर प्रदेशात अशी सेवा फक्त ३० टक्के आहे.देशात पंजाबमध्ये इंटरनेटची सेवा १०० टक्के आहे. तेथे १२,६६० खेड्यांत इंटरनेटची पूर्ण सेवा आहे. २०११ मध्ये झालेल्या जनगणनेत या खेड्यांची संख्या १२,१६८ होती. 

हरयाणात इंटरनेची सेवा ९० टक्क्यांपेक्षा जास्त उपलब्ध आहे. थ्री जी, फोर जी सेवा राज्यातील १०० टक्के खेड्यांत उपलब्ध आहे. केरळमध्ये इंटरनेटची सेवा ९५ टक्के खेड्यांत आहे.

आता ऑगस्ट २०२३ : पंतप्रधान मोदी यांनी आता हे लक्ष्य गाठण्यासाठी ऑगस्ट २०२३ निश्चित केले आहे. हे लक्ष्य गाठण्यासाठी भारत संचार निगम लिमिटेडला अपयश आल्यामुळे मोदी यांनी खासगी सेवादारांकडून निविदा मागवून पीपीपी मॉडेलचा आधार घेतला आहे.

टॅग्स :InternetइंटरनेटMaharashtraमहाराष्ट्र