शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'
2
महाराष्ट्रातले पोलीस अकार्यक्षम; शिंदेसेनेच्या आमदाराचा महायुती सरकारलाच घरचा आहेर
3
एकीकडे युद्धाचे सावट, त्यात पाकिस्तानमधील लाहोर विमानतळावर भीषण आग, उड्डाणं रद्द, प्रवासी अडकले
4
कधीही, कुठेही, मोहिमेसाठी तयार! भारतीय नौदलाचा पाकिस्तानला संदेश
5
अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ मेड इन इंडिया आयफोन; चीनला जोरदार झटका
6
“चिमुकल्यांना हृदयरोग, १ कोटी खर्च, भारतात उपचार घेऊ द्या”; पाकमधील पालकांचे सरकारला साकडे
7
"जर सिंधु नदीचं पाणी रोखलं तर...": पाकिस्तानी PM शहबाज शरीफ यांची भारताला पोकळ धमकी
8
Vastu Shastra: वास्तुशास्त्रानुसार तव्यावरच्या पहिल्या पोळीवर हक्क कुणाचा? वाचा आणि कृती करा!
9
जळगाव: घरात घुसला म्हणून वाचला! वाढदिवसाचं सेलिब्रेशन करतानाच आले अन् झाडल्या गोळ्या
10
भारत-पाकिस्तानमध्ये तणाव, डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतःला केलं दूर; म्हणाले, 'त्यांचं ते मिटवून घेतील'
11
'सिंधूतून आमचे पाणी वाहणार, नाहीतर भारताचे रक्त'; पाणी रोखताच पाकचे माजी मंत्री बिलावल भुत्तोंचा थटथयाट
12
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
13
JioHotstar नं केली बक्कळ कमाई, बनला जगातील दुसरा सर्वात मोठा पेड युजर बेस
14
दोन मित्र आणि पहारेकऱ्याची हत्या, मग कापलं गुप्तांग, आरोपी अटकेत, समोर आलं धक्कादायक कारण
15
शनी गोचर २०२५: 'या' ५ राशींच्या आयुष्यात वादळाची शक्यता, आर्थिक बाजू सांभाळा!
16
सूरज चव्हाणच्या 'झापुक झुपूक' सिनेमाने पहिल्या दिवशी किती कमावले? बॉक्स ऑफिस कलेक्शन समोर
17
पाकिस्तानचे लज्जास्पद कृत्य! उच्चायुक्तालयाबाहेर निदर्शने, अधिकाऱ्याचा हातवारे करुन इशारा; पाहून तुम्हालाही राग येईल
18
आस्ताद काळेने सांगितली 'छावा'मधली मोठी चूक, म्हणाला- "छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक..."
19
ड्रीम कारसाठी दहा वर्षे वाट पाहिली, शोरूममधून बाहेर पडताच तासाभरात जळून खाक झाली
20
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी

मर्कटलीलांनी ५,४४३ जण घायाळ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 1, 2024 11:16 IST

Pune Crime News: राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत.

पुणे  - राज्यात सर्व जिल्ह्यांत मिळून गेल्यावर्षी (२०२३) ५,४४३ जणांना माकडाने चावा घेतल्याची नाेंद राज्याच्या आराेग्य विभागाकडे झाली आहे. त्यापैकी सर्वाधिक ७१० जणांना चावे हे मराठवाड्यातील जालना जिल्ह्यात झाले आहेत. याच कालावधीत राज्यात ६० हजार ५४३ जणांना मांजर चावल्याचीही नाेंद झाली आहे.

वन्यप्राणी किंवा पाळीव प्राण्यांनी माणसाला चावा घेतल्यास रेबिज हाेण्याची शक्यता असते. ताे हाेऊ नये म्हणून त्यावर आराेग्य यंत्रणेकडे प्रतिबंधात्मक लस घेतली जाते. सरकारी रुग्णालयांत लस घेताना आराेग्य यंत्रणेकडे नोंद केली जाते. अशा प्रकारे केलेल्या नोंदीतून ही आकडेवारी समोर आली आहे.

मांजरांचे सर्वाधिक चावे मुंबईतमुंबईत मांजरांच्या सर्वाधिक १२,७३२ चाव्यांची नाेंद झाली. त्याखालाेखाल काेल्हापूर (९,०४५), ठाणे (६,४११), रायगड (३,०९८) आणि पाचव्या क्रमांकावर पालघर असून, तेथे २ हजार २२० जणांना माजरांनी चावे घेतले आहेत. 

जालन्यात सर्वाधिक माकडांचे चावे जालना जिल्ह्यापाठोपाठ (७१०) अमरावती (५७६), उस्मानाबाद (५०६), मुंबई (३८२) आणि सातारा जिल्ह्यात २६२ जणांना माकडांनी चावे घेतले आहेत. यवतमाळमध्ये सर्वांत कमी १२ चावे नाेंदवले गेले आहेत.  

टॅग्स :MonkeyमाकडMaharashtraमहाराष्ट्र