वध्र्यात 5 महिन्यांत 54 शेतक:यांच्या आत्महत्या
By Admin | Updated: November 26, 2014 01:47 IST2014-11-26T01:47:15+5:302014-11-26T01:47:15+5:30
या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही.

वध्र्यात 5 महिन्यांत 54 शेतक:यांच्या आत्महत्या
वर्धा : या वर्षीचा खरीप हंगाम सुरुवातीपासून शेतक:यांना दगा देणारा ठरला. कर्ज काढून दुबार-तिबार पेरणी केली, तरीही पीक हाती आले नाही. यामुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटावर मात कशी करावी, या विवंचनेत वर्धा जिल्ह्यात गेल्या पाच महिन्यांत 54 शेतक:यांनी आपली जीवन यात्र संपवली आह़े तर गेल्या वर्षभरात 113 शेतक:यांनी आत्महत्या केल्या.
यंदा जून महिन्यात पावसाने हजेरी लावली. नव्या जोमाने शेतक:यांनी कापसाची लागवड केली. पावसाच्या आशेवर सोयाबीनची पेरणी केली. काही शेतकरी पेरणीसाठी पावसाच्या प्रतीक्षेत होते. मात्र,सलग दोन महिने पाऊसच आला नाही. यामुळे शेतक:यांचे गणितच बिघडले. ज्यांनी पेरणी केली होती. त्यांना दुबार-तिबार पेरणी करावी लागली. ज्यांनी पेरणीच केली नव्हती, त्यांना यंदा शेती पिकण्याची शाश्वती नव्हती. या कालचक्रात शेतकरी पुरता हैराण झाला. कशीबशी पेरणी उरकली. पिकांची वाढ अपेक्षेनुसार झाली नाही. याचा परिणाम थेट उत्पन्नावर दिसून आला.
शेतीसाठी लागणारा खर्च तर निघाला नाहीच, शिवाय दुष्काळी स्थिती असतानाही पिकांना भाव मिळाला नाही. यामुळे शेतक:यांचे वर्षभराचे बजेट कोलमडले. या विवंचनेत बहुतांश शेतक:यांनी आत्महत्या केल्याचे दिसून येते. मागील वर्षी अपेक्षेपेक्षा अधिक पाऊस झाल्याचा परिणामही खरीप हंगामावर झाला होता. यंदा पाऊस कमी झाल्याचा परिणाम झाला. 2क्13 च्या सप्टेंबरमध्ये 9, ऑक्टोबरमध्ये 11, नोव्हेंबर 15, डिसेंबर 6 आणि यानंतर 2क्14 च्या जानेवारीमध्ये 1क्, फेब्रुवारी 12, मार्च 14 आणि मेमध्ये 14 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले.
यानंतर पुढील खरीप हंगामही धोक्यात येत असल्याचे दिसताच आत्महत्येचे सत्र वर्षभर सुरूच असल्याचे आकडेवारीवरुन दिसून येते. जूनमध्ये 6, जुलै 1क्, ऑगस्ट 11, सप्टेंबर 16, ऑक्टोबर 8 आणि चालू नोव्हेंबर महिन्यात 3 शेतक:यांनी मृत्यूला कवटाळले आह़े (प्रतिनिधी)
83 प्रकरणो पात्र
या वर्षी झालेल्या 113 शेतकरी आत्महत्येच्या प्रकरणांपैकी 83 प्रकरणो शासकीय मदतीस पात्र ठरली आहेत. 18 प्रकरणो अपात्र ठरली असून 12 प्रकरणो प्रलंबित आहेत. यामध्ये 66 प्रकरणो शेतक:यांची असून, 47 प्रकरणो शेतकरी कुटुंबातील आहेत.