53 लाखांच्या दरोड्याचा बनाव 2 तासांमध्ये उघडकीस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 24, 2016 16:32 IST2016-10-24T16:32:41+5:302016-10-24T16:32:41+5:30
एका दाम्पत्यास राहत्या घरातच बांधून ठेवून मारहाण करून त्यांनी जमीन व्यवहारासाठी घरात ठेवलेले ५३ लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद

53 लाखांच्या दरोड्याचा बनाव 2 तासांमध्ये उघडकीस
>आॅनलाईन लोकमत
सातारा, दि. 24 - एका दाम्पत्यास राहत्या घरातच बांधून ठेवून मारहाण करून त्यांनी जमीन व्यवहारासाठी घरात ठेवलेले ५३ लाख रुपये चोरून नेल्याची फिर्याद कोरेगाव तालुक्यातील वाठार पोलिस ठाण्यात दाखल झाली. परंतू, पोलिसांनी तपासाची चक्रे गतिमान करुन अवघ्या दोन तासांत हा बनाव असल्याचे उघड केले.
जिल्ह्यात दरोड्याचे सत्र सुरू असल्याने पिंपोडे बुद्रुक येथील या घटनेची वाठार पोलिसांनी गांभीर्याने दखल घेत तपास सुरू केला. त्यासाठी साता-यातून श्वान पथकासह विविध पथकांमार्फत या घटनेचा सखोल तपास केला. परंतू, तपासात ठोस हाती काही लागत नसल्याने फिर्यादी बनाव करत असल्याचा संशय आला. त्यादृष्टीने संबंधित फिर्यादीची पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बनाव रचल्याचे कबूल केले.
‘अनेक ठिकाणी काढलेले कर्ज परत फेड करू शकत नसल्यामुळे हा बनाव केला.’ अशी कबुली त्याने पोलिसांकडे केली.