शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
"रशियाने मोठा तेल ग्राहक गमावला..."; पुतिन यांच्यासोबतची बैठक अयशस्वी, अलास्कातून ट्रम्प यांचं भारतासंदर्भात मोठं विधान!
3
SBI चा ग्राहकाना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
4
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
5
LIC च्या ‘या’ स्कीममध्ये दररोज करा ४५ रुपयांची गुंतवणूक; जमा होईल २५ लाखांचा फंड, कोणती आहे योजना?
6
'रामायण' हॉलिवूडपेक्षा कमी नाही...सनी देओलने दिली प्रतिक्रिया; हनुमानाच्या भूमिकेत दिसणार
7
उपराष्ट्रपती निवडणूक: रविवारी ठरणार NDA उमेदवार, PM मोदी निर्णय घेणार; २१ तारखेला अर्ज भरणार!
8
लाडक्या बहि‍णींमुळे STची एकाच दिवशी ३९ कोटींची कमाई; ४ दिवसांत ८८ लाख महिलांचा प्रवास
9
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
10
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
11
Dahi Handi 2025: गोपाळकाल्याचा प्रसाद खाऊन झाल्यावर हात न धुण्याच कारण काय?
12
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
13
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
14
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
15
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
16
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
17
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
18
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
19
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
20
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार

Mucormycosis: चिंताजनक! राज्यात कोरोनानंतर म्युकरमायकोसिसचं थैमान, ५२ जणांचा मृत्यू; अनेकांनी डोळे गमावले

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2021 06:40 IST

या दुर्मीळ आजारामुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत.

मुंबई : कोरोनातून बरे झालेल्या काही रुग्णांमध्ये म्युकरमायकोसिस हा बुरशीजन्य आजार बळावत असल्याची उदाहरणे राज्यभरात दिसून आली आहेत. या दुर्मीळ आजारामुळे राज्यात ५२ जणांचा मृत्यू झाला आहे, तर अनेकांना आपले डोळे गमवावे लागले आहेत. राज्यभरात या आजाराची काय स्थिती आहे, याचा आढावा ‘लोकमत’च्या चमूने घेतला. त्याचाच हा ग्राउंड रिपोर्ट.

प. महाराष्ट्र/कोकण पुण्यात १३ जणांचा मृत्यू एक हजारावर रुग्ण -पुण्यात विविध रुग्णालये, डेंटल क्लिनिकमध्ये या आजाराचे सुमारे एक हजार रुग्ण आढळले, तर १३ जणांचा मृत्यू झाला आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयातनाकात इजा झालेले तीन, डोळ्याला आजार झालेले दोन रुग्ण उपचार घेत आहेत. डॉक्टरांकडे उपचार घेणारे ४० रुग्ण आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा, रायगड, व सिंधुदुर्ग जिल्ह्यांत एकही रुग्ण आढळलेला नाही.   

मुंबई -१२ जणांचा एक डोळा काढला -केईएम, नायर, सायन या पालिका रुग्णालयांमध्ये म्युकरमायकोसिस रुग्णांचे निदान वाढले आहे. २ ते ३ रुग्ण आढळल्याचे अधिष्ठाता डॉ. रमेश भारमल यांनी सांगितले. 

उत्तर महाराष्ट्र -शेकडो जणांना लागण -नाशिक शहर व जिल्ह्यात मिळून ५ जणांचा म्युकरमायकोसिसने मृत्यू झाला आहे. शासकीय रुग्णालयात सध्या मात्र नवीन कोणीही रुग्ण दाखल झालेले नाहीत. जळगाव जिल्ह्यात म्युकरमायकोसिसचे १३ रुग्ण असून, ६ जणांचा मृत्यू झाला आहे.  ५० पेक्षा अधिक रुग्णांवर विविधप्रकारच्या शस्त्रक्रिया करण्यात आल्या आहेत. टाळूला छिद्रे पडल्याचे प्रकारही या आजारात जळगावात निदर्शनास आले आहेत. अहमदनगर जिल्ह्यामध्ये १८ रुग्ण आढळले. 

दररोज नवे रुग्ण -नागपूरमध्ये आठवड्याला २० ते २५ रुग्णांची नोंद होत आहे. मागील तीन महिन्यांत खासगी आणि शासकीय रुग्णालये मिळून ३५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करून एक डोळा काढण्याची वेळ आली. शासकीय दंत महाविद्यालय व रुग्णालयात चार महिन्यांत ४९ रुग्णांची नोंद झाली. अमरावतीत सध्या पाच रुग्ण दाखल असून आठ रुग्णांवर यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आल्याचे डॉ. श्रीकांत महल्ले यांनी सांगितले. यवतमाळ जिल्ह्यात आतापर्यंत सात रुग्णांवर शस्त्रक्रिया झाल्या. 

 मराठवाडा -१३ जणांना अंधत्व -औरंगाबादेत म्युकरमायकोसिसमुळे २४ जणांचा मृत्यू झाला असून, १३ जणांचे डोळे काढले, तर ९६ जणांच्या जबड्यावर आणि सायनसमुळे ४५ रुग्णांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्याची माहिती अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कमलाकर मुदखेडकर यांनी दिली.  नांदेड जिल्ह्यात १२० हून अधिक रुग्ण आढळले आहेत. बीड जिल्ह्यातील माजलगावात १५ दिवसांत म्युकरमायकोसिसचे पाच रुग्ण आढळले आहेत.  

टॅग्स :Mucormycosisम्युकोरमायकोसिसcorona virusकोरोना वायरस बातम्याMaharashtraमहाराष्ट्रCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस