पुण्यात कचऱ्यात सापडले 52 हजार
By Admin | Updated: November 10, 2016 15:17 IST2016-11-10T15:01:38+5:302016-11-10T15:17:16+5:30
पुण्यात कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक हजाराच्या तब्बल 52 नोटा आढळून आल्या आहेत.

पुण्यात कचऱ्यात सापडले 52 हजार
style="text-align: justify;"> ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. 10 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतल्यापासून काळा पैसा असलेल्यांची बोबडी वळली आहे. त्यांच्याकडून चलनबाह्य 500 आणि एक हजार रुपयांच्या नोटांची विल्हेवाट लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
500 हजारांच्या नोटा फाटल्याच्या, जाळल्याच्या बातम्या देशभरातून येत असतानाच आता पुण्यात डेक्कनच्या लॉ कॉलेज रस्त्यावर कचऱ्याच्या ढिगाऱ्यात एक हजाराच्या तब्बल 52 नोटा आढळून आल्या आहेत. कचरावेचक महिलेने या नोटा प्रमाणिकपणे पोलिसांकडे जमा केल्या आहेत.
कचरा वेचक शांताबाई ओव्हाळ या विधी महाविद्यालय रस्ता आणि प्रभात रस्ता परिसरात कचरा उचलण्याचे काम करतात. आज सक़ाळी साडेदहा वाजता कचरा जमा केल्यानंतर कांचनगल्ली परिसरात ओल्या आणि सुक्या कचऱ्याचे वर्गीकरण करीत असताना त्यांना एका काळया रंगाच्या प्लॅस्टिकच्या पिशवीमध्ये या नोटा आढळून आल्या. त्यांनी याची माहिती या भागाचे मुकादम खंडू कसबे यांना दिली. या दोघांनी मिळून हि रक्कम डेक्कन पोलीस ठाण्यात ही जमा केली. पोलीस अधिकाऱ्यांनी या नोटा बनावट आहेत की खऱ्या हे तपासणीसाठी पाठविण्यात आल्या.