शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
2
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
3
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
4
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
5
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
6
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
7
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
8
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
9
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
10
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!
11
झुनझुनवालांनी 'या' कंपनीचे सर्व शेअर्स विकले, ३ वर्षात १११% रिटर्न; Zerodha च्या निखिल कामथांचीही आहे गुंतवणूक
12
"१५-२० वर्ष इथे राहूनही मराठी येत नसेल तर लाज वाटली पाहिजे...", श्रुती मराठे स्षष्टच बोलली
13
'ही' आहे अखेरची तारीख; इन्कम टॅक्स रिटर्न फाईल केलं नाही तर लागेल मोठा दंड, पाहा डिटेल्स
14
"...अन् कुंदन डोळे उघडतो", 'रांझणा'चा AI व्हिडिओ पाहिलात का? थिएटरमध्ये शिट्ट्यांचा कडकडाट
15
ब्रह्मोस क्षेपणास्त्र मिळाल्याने चीनचा 'हा' शत्रू झाला खूश! करतोय अमेरिकेला धक्का देण्याची तयारी
16
कोकणातील प्रसिद्ध Red Soil Stories युट्युब चॅनेलच्या शिरीष गवस यांचं आकस्मिक निधन 
17
मानवी हाडे, लाल ब्लाऊजचा तुकडा अन् ATM कार्ड...; जमिनीत गाडलेल्या शेकडो मृतदेहाचे रहस्य उलगडणार
18
पीएम किसान योजनेच्या २०व्या हप्त्याची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, असा तपासा स्टेटस
19
"अरुण जेटलींनी मला धमकावलं होतं"; राहुल गांधींच्या आरोपावर जेटलींच्या मुलाचे प्रत्युत्तर, "पर्रिकरांसोबतही तुम्ही..."
20
मुंबईत शिंदेसेना आक्रमक, काँग्रेसच्या टिळक भवनावर मोर्चा; पोलिसांनी कार्यकर्त्यांना रोखले

५२ थेट लढती; रिंगणात दोघेच; कुठे काट्याची, कुठे एकतर्फी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2019 06:16 IST

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या.

लोकसभेच्या आजवरच्या सर्व १६ सार्वत्रिक निवडणुकांमध्ये महाराष्ट्रात ५२ मतदारसंघात प्रत्येकी दोनच उमेदवार असल्याने थेट लढती झाल्या. कुठे काट्याची लढत झाली, तर काही ठिकाणी एकतर्फी निकाल लागले. महाराष्ट्रातील अशी शेवटची थेट लढत १९९८ साली साताऱ्यात झाली. त्यावेळी काँग्रेसचे अभयसिंहराजे भोसले यांनी शिवसेनेचे हिंदुराव नाईक निंबाळकर यांचा १ लाख ८१ हजार मतांनी पराभव केला होता. त्यानंतर, गेल्या ४ निवडणुकांमध्ये राज्यात अशी एकही थेट लढत झाली नाही. १९९८च्या पूर्वीच्या तीन निवडणुकांमध्ये (१९८९, १९९१ व १९९६) राज्यात सर्व मतदारसंघात तीन किंवा त्यापेक्षा जास्त उमेदवार रिंगणात होते. पहिल्या निवडणुकीत (१९५१) राज्यात तब्बल १७ ठिकाणी तर १९७७ साली १६ ठिकाणी दोनच उमेदवार रिंगणात होते.

१९८४ मध्ये फक्त सांगलीत दोन उमेंदवार होते. त्यावेळी माजी मुख्यमंत्री वसंतदादांचे पुत्र प्रकाशबापू पाटील (काँग्रेस) यांनी जनता पार्टीचे विश्वासराव पाटील यांना पराभूत केले होते. १९८० मध्येही फक्त सांगलीतच अशी लढत झाली. त्यावेळी खुद्द वसंतदादा पाटील (काँग्रेस) यांनी विश्वासराव पाटील (जनता पार्टी) यांचा १ लाख ६७ हजार मतांनी पराभव केला होता. तेव्हापासून २००९ पर्यंत सांगलीकरांनी लोकसभा निवडणुकीत वसंतदादा घराण्यालाच कौल दिला होता. पण गेल्यावेळी मात्र त्यांचे नातू प्रतिक पाटील यांचा मोठ्या फरकाने दारुण पराभव झाला. यंदा येथे पाटील घराण्यातील उमेदवार विशाल पाटील (स्वाभिमानी) रिंगणात आहे, पण काँग्रेसचा उमेदवार मात्र नाही.

१९७७ साली तब्बल १६ ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. यात सांगली, राजापूर, रत्नागिरी, कुलाबा, डहाणू, नंदूरबार, एरंडोल, नांदेड, जालना, बीड, लातूर, सोलापूर, पंढरपूर, खेड व बारामती या मतदारसंघांचा समावेश होता. नंदुरबार, सोलापूर, पंढरपूर, खेड, सांगली व इचलकरंजी या ६ ठिकाणी त्यावेळी काँग्रेसने बाजी मारली. इतर सर्व १० ठिकाणी इतर पक्षांचे उमेदवार विजयी झाले होते. त्यावेळी लातुरात काट्याची लढत होऊन शेकापचे उद्धवराव पाटील यांनी काँग्रेसचे पंढरीनाथ पाटील यांचा अवघ्या ७ हजार ८५१ मतांनी पराभव केला होता.

१९७१ मध्ये फक्त सोलापुरात दोन उमेदवार होते. त्यात काँग्रेसचे सूरजरतन दमानी यांनी पत्रकार रंगाअण्णा वैद्य (अपक्ष) यांचा ९० हजार मतांनी पराभव केला होता. १९६७ च्या निवडणुकीत पंढरपूर, मालेगाव व नंदुरबार हे तीन राखीव मतदारसंघ आणि नाशिक अशा चार ठिकाणी दोनच उमेदवार होते. यापैकी पंढरपुरात (एससी राखीव) काँग्रेसचे टीएच सोनवणे फक्त १,०७९ मतांनी विजयी झाले होते. मालेगाव (एसटी) मध्ये काँग्रेसचे झामरू कहांडोळे यांनी फक्त ९,२०२ मतांनी बाजी मारली होती. इतर दोन मतदारसंघातील मताधिक्य ३६ हजारांहून जास्त होते.

१९६२ मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते. १९५१ म्हणजे पहिल्या निवडणुकीत तब्बल १७ ठिकाणी प्रत्येकी दोनच उमेदवार रिंगणात होते. औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, परभणी, जालना, मुंबई शहरउत्तर, चंद्रपूर, धुळे, पूर्व खांदेश, पश्चिम खांदेश, पुणे, रत्नागिरी,कराड, कोपरगाव, कुलाबा, मालेगाव व मिरज या १७ ठिकाणी दोनच उमेदवार होते.१९६२मध्ये अहमदनगर, जळगाव, जालना, बीड आणि औरंगाबाद या पाच ठिकाणी दोन-दोनच उमेदवार होते. १९५७ मध्ये अहमदनगर दक्षिण, अंबड, बीड, कुलाबा, उस्मानाबाद आणि परभणी या ६ ठिकाणी दोन-दोन उमेदवार उभे होते.