शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
2
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
3
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
4
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
5
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
6
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
7
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
8
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
9
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
10
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
11
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
12
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
13
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
14
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
15
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
16
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
17
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
18
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
19
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
20
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
Daily Top 2Weekly Top 5

राज्यात एका महिन्यात ५२ लाख लोकांनी घेतले डिजिटल सातबारे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2020 16:41 IST

राज्याला डिजिटल सातबाऱ्यांच्या माध्यमातून एका महिन्यात 2 कोटी 60 लाखांचा महसूल,

ठळक मुद्देकोविडच्या पार्श्वभूमीवर महसूल विभागाचा नवा उच्चांक

पुणे : कोविडच्या पार्श्वभूमीवर राज्यभरात बहुतेक सर्व सरकारी कार्यालयांचे कामकाज बंद आहे. परंतु या कोरोना काळात राज्यभरातील महसूल विभागाने नवा विक्रम केला असून, एका महिन्यात तब्बल ५२ लाखांहून अधिक लोकांनी डिजिटल सातबाऱ्यांचे वाटप केले आहे. मे-जून शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पीक कर्ज घेण्यासाठी सातबारा, फेरफार व खाते उतारा लागतो. गेल्या काही वर्षांपासून महसूल विभागाने आपला कारभार ऑनलाईन करण्यासाठी घेतलेल्या परिश्रमामुळे कोरोना काळात लाखो नागरिकांची सोय झाली.

राज्य शासनाच्या महसूल विभागाने डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा , फेरफार आणि खाते उतारे ऑनलाईन पध्दतीने उपलब्ध करून देण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. महसूल विभागाकडून यापूर्वीच ई.-फेरफार प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या माध्यमातून भूमी अभिलेख विभागाशी संबंधित अनेक सुविधा या ऑनलाइन उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. त्यापैकी एक डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा, फेरफार उतारा आणि खाते उतारा ऑनलाईन पध्दतीने शुल्क आकारून उपलब्ध करून दिला जातो. त्यासाठी पेमेंट गटवेची सुविधा देखील खात्याकडून उपलब्ध करून देण्यात आली आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत मागील तीन महिन्यात राज्यातील ४१ लाख ११ हजार सातबारे उतारे,२० लाख १६ हजार खाते उतारे आणि २ लाख १ हजार फेरफार उतारे ऑनलाईन पध्दतीने नागरिकांनी घेतले होते. परंतु जून महिन्यात हे रेकॉर्ड मोडले गेले. या एका महिन्यात महाभूमी पोर्टलवरून जवळपास ५२ लाख ७ हजार ९३९ नागरिकांनी रुपये शुल्क भरून डिजिटल स्वाक्षरी असलेले सातबारा उतारे घेतले आहे. त्यातून राज्य सरकारला २ कोटी ६० लाख रूपयांचा महसूल मिळाला आहे. भूमी अभिलेख खात्याच्या इतिहासात हा विक्रम नोंदविला गेला आहे. खरीप पीक कर्ज, पीक विमा आणि विविध योजनांसाठी डिजिटल स्वाक्षरी असलेला सातबारा उतारा कायदेशीर धरला जातो. त्यामुळे या कामांसाठी नागरीकांनी मोठ्या प्रमाणावर या सुविधेचा लाभ घेतला असल्याचे समोर आले आहे.-----------------  महसूलच्या ऑनलाईन कारभाराचा नागरिकांना लाभमहसूल विभागाच्या वतीने सातबार, फेरफार व खाते उतारे व अन्य कागदपत्रे मिळण्यासाठी नागरिकांना तलाठी, सर्कल किंवा तहसीलदार कार्यालयात अनेक हेलपाटे घालावे लागत होते. तसेच यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार देखील होत असल्याच्या अनेक तक्रारी येत असे. यामुळेच शासनाने ऑनलाईन सातबार करण्याची मोहीम हाती घेतली. सुरूवातीच्या काळात याला मोठा विरोध झाला. परंतु अखेर हा प्रकल्प पूर्ण झाला असून, नागरिकांना लाभ होऊ लागला आहे. - रामदास जगताप, उपजिल्हाधिकारी तथा राज्य समन्वयक ,ई फेरफार प्रकल्प

टॅग्स :PuneपुणेFarmerशेतकरीdigitalडिजिटलState Governmentराज्य सरकारRevenue Departmentमहसूल विभाग