५१ विद्यार्थिनींना विषबाधा
By Admin | Updated: October 9, 2015 02:33 IST2015-10-09T02:33:58+5:302015-10-09T02:33:58+5:30
सांगोला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील ५१ मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. या मुलींवर औषधोपचार करून त्यांना वसतीगृहाकडे सोडण्यात आले.

५१ विद्यार्थिनींना विषबाधा
सांगोला : सांगोला महाविद्यालयाच्या वसतीगृहातील ५१ मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याने खळबळ उडाली. या मुलींवर औषधोपचार करून त्यांना वसतीगृहाकडे सोडण्यात आले.
कडलास रोडवर सांगोला महाविद्यालय असून पदवीचे शिक्षण घेण्यासाठी विविध तालुक्यांतील सुमारे १७५ विद्यार्थीनी महाविद्यालयाच्या वसतीगृहात राहात आहेत. वसतीगृहातील मुलींना महाविद्यालयाच्या मेस मधूनच दररोज जेवण दिले जाते. बुधवारी रात्रीच्या जेवणानंतर गुरुवारी सकाळी वसतीगृहातील काही मुलींना पोटात दुखणे, जुलाब असे प्रकार होऊ लागले. त्यांना तातडीने हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले.
वसतीगृहातील मुलींना जेवणातून विषबाधा झाल्याचे प्रकरण महाविद्यालय प्रशासनाने गांभीर्याने घेतले आहे. गुरुवारी झालेल्या प्रकाराची मेस चालकाकडून चौकशी करून योग्य तो निर्णय घेणार आहोत.
- कृष्णा इंगोले, प्राचार्य
ज्या ५१ मुलींवर औषधोपचार करण्यात आले अशा सर्व मुलींना बॅक्टेरियल इन्फेक्शन झाले होते. मुलींवर उपचार करून घरी सोडून देण्यात आले.
- डॉ. शिवराज भोसले