शहरं
Join us  
Trending Stories
1
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
2
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
3
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
4
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
5
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
6
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
7
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
8
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
9
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!
10
देशहितासाठी आ‌वश्यक ते सर्व केंद्राने करावे; जातनिहाय जनगणनेवर संघाची भूमिका
11
धक्कादायक! सांगलीतील आष्ट्यात विहिरीत पोहण्यासाठी गेलेल्या दोन जणांचा बुडून मृत्यू
12
भारत कधीही हल्ला करेल; पाकिस्तान घाबरला, PoK ला जाणारी सर्व देशांतर्गत उड्डाणे केली रद्द
13
"मोदी सरकारने घेतलेला निर्णय ऐतिहासिक...", जात जनगणनेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा काँग्रेसवर गंभीर आरोप 
14
यवतमाळ: १२ तासात दोन खून! दारूच्या वादात जावायाला संपवले; मालमत्तेच्या वादातून मोठ्या भावाची हत्या
15
गंगेप्रमाणेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघालाही थांबविण्याचे कोणाकडे साहस नाही: भैय्याजी जोशी
16
जातिनिहाय जनगणनेचा निर्णय हा राहुल गांधींच्या संघर्ष व विचारांचा मोठा विजय: हर्षवर्धन सपकाळ
17
अमूल दूध २ रुपयांनी महागले, महागाईने बेजार झालेल्या सर्वसामन्यांना झटका!
18
कोकण मंडळाच्या योजनेअंतर्गत म्हाडा विकणार १३,३९५ घरे; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का?
19
जातीय जनगणनेसाठी सरकारला पूर्ण पाठिंबा, पण..., राहुल गांधींच्या केंद्राला 'या' 4 मागण्या
20
दाैंडच्या खून प्रकरणी १२ जणांना जन्मठेप! आरोपींमध्ये चार सख्खे भाऊ, तीन महिलांचा समावेश

महाराष्ट्रात ५० हजार कोटींचा ‘डेडिकेटेड कॉरिडॉर’ उभारणार, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची ‘लोकमत’शी विशेष बातचीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 08:20 IST

Raosaheb Danve : डेडिकेटेड कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटी या मालवाहतूक बंदराला जोडणार आहे. रेल्वेने होणारी मालवाहतूक थेट जेएनपीटीच्या बंदरात गतीने पोहोचण्यास याची मोठी मदत होईल, असे दानवे यांनी सांगितले.   

- संजय देशमुख  

जालना : महाराष्ट्राचा विचार करता ५० हजार कोटी रुपयांच्या डेडिकेटेड कॉरिडॉरचे काम पूर्ण करण्यासाठी  आपले प्राधान्य राहणार असून, त्यासाठी राज्य सरकारसह त्या-त्या जिल्ह्यातील जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यातील अडथळे दूर करणार असल्याची माहिती रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.    रेल्वेची कामे कधीही न संपणारी असतात. ती कामे एका रात्रीत किंवा एखाद्या वर्षात पूर्ण होतीलच असे नसते. त्यामुळे जी कामे हाती घेतली आहेत, त्यातील कामांचे प्राधान्यक्रम ठरवून ती पूर्ण करण्यावर भर असतो. महिनाभरापूर्वीच आपल्याकडे या खात्याची जबाबदारी  पंतप्रधान नरेंद्र मोदी तसेच गृहमंत्री अमित शहा यांनी सोपविली आहे.  या महिनाभरात अनेक  वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन त्यातील प्राधान्यक्रम समजावून घेतला. त्यात महाराष्ट्रासाठी सर्वांत महत्त्वाचा म्हणजे डेडिकेटेड कॉरिडॉर हा ५० हजार कोटींचा प्रकल्प पूर्ण करण्यावर आपला भर राहणार असून, यासाठी राज्य सरकारशी चर्चा करून त्यातून मार्ग काढण्यासाठी आपण पुढाकार घेणार आहोत. मुंबईजवळील पालघर, ठाणे या जिल्ह्यांतील जिल्हाधिकाऱ्यांशी देखील याबाबत चर्चा करणार असल्याचे ते म्हणाले.  

कॉरिडॉर जेएनपीटीला जोडणार डेडिकेटेड कॉरिडॉर मुंबईतील जेएनपीटी या मालवाहतूक बंदराला जोडणार आहे. रेल्वेने होणारी मालवाहतूक थेट जेएनपीटीच्या बंदरात गतीने पोहोचण्यास याची मोठी मदत होईल, असे दानवे यांनी सांगितले.   

खासदारांची बैठक घेणार मराठवाड्यातील रेल्वे समस्यांवर मार्ग काढण्यासह रेल्वेची कोणकोणती कामे ही प्राधान्यक्रमाने मराठवाड्यात आवश्यक आहेत, त्यावर चर्चा करून निर्णय घेण्यासाठी लवकरच मराठवाड्यातील १२ खासदारांची बैठक घेणार असल्याचे ते म्हणाले. त्यासंदर्भातील सूचना नांदेड येथील दक्षिण मध्य रेल्वेच्या व्यवस्थापकांना सकाळीच दिल्याचे दानवे यांनी सांगितले.  

चाळीस दिवस मतदारसंघापासून दूर ७ जून रोजी मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला. त्यात त्यांना अत्यंत महत्त्वाची अशी तीन खाती मिळाली. रेल्वेसह कोळसा आणि खाण ही खाती त्यांना देण्यात आली. पंतप्रधान मोदी यांनी सर्व मंत्र्यांना १५ ऑगस्टपर्यंत दिल्ली न सोडण्याची सूचना केली होती. मतदारसंघातील हजारो चाहत्यांनी दिल्लीत येऊन त्यांना शुभेच्छा दिल्या; परंतु सलग चाळीस दिवस आपण आपल्या मतदारसंघापासून दूर राहण्याची ही पहिलीच वेळ असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :raosaheb danveरावसाहेब दानवेrailwayरेल्वे